प्रवासादरम्यान महिलेच्या तीन लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 18:49 IST2020-01-25T18:48:39+5:302020-01-25T18:49:32+5:30
तीन लाख १० हजार २०० रुपये किमतीचे १२ तोळे ५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास

प्रवासादरम्यान महिलेच्या तीन लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
पिंपरी : प्रवासादरम्यान महिलेचे तीन लाख १० हजार २०० रुपये किमतीचे १२ तोळे ५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. चिपळून ते दिघी (पिंपरी-चिंचवड) प्रवासादरम्यान १५ ते १६ नोव्हेंबर २०१९ दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. शिल्पा अनुप नलावडे (वय २७, रा. विजयनगर, आळंदी रोड, दिघी, मूळ रा. कोंढे चंदनवाडी स्टॉपजवळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बहादूर शेख नाका, चिपळूण ते दिघी (पिंपरी-चिंचवड, पुणे) दरम्यान प्रवास करीत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने तीन लाख १० हजार २०० रुपये किमतीचे १२ तोळे ५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.