शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाने नशेसाठी केली पासोड्या विठोबा मंदिरात चोरी; १२ तासात गुन्हा उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 21:03 IST

मित्राच्या मदतीने बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम पळविली होती.

ठळक मुद्देहे दोघेही नशाबाज असून अगोदर त्यांनी दोन, तीन ठिकाणी केला चोरीचा प्रयत्न

पुणे : बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरातील दान पेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरुन नेणार्‍या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन १२ तासाच्या आत फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. नशेसाठी या अल्पवयीन मुलाने मित्राच्या मदतीने ही चोरी केली होती. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.पासोड्या विठोबा मंदिरात रविवारी पहाटे दान पेटी फोडून त्यातील रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता.याबाबत पोलिसांनी सांगितले की, लॉकडाऊन असल्याने मंदिराच्या परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही बंद होते. आजू बाजूच्या परिसरात पोलिसांनी शोध घेतल्यावर त्यांना पहाटे ४ वाजता दोघे जण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. खडकीतील या १६ वर्षाच्या मुलाला फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याने चौकशीत चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.हे दोघेही नशाबाज असून त्यांना नशेसाठी पैसे नसल्याने त्या अगोदर त्यांनी दोन, तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर मंदिरात वरच्या बाजूने ते आत शिरले व दान पेटी स्कू ड्रायव्हरच्या सहाय्याने उचकटली व त्यातीलरक्कम चोरली होती.फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, दादासाहेब गायकवाड यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी,हवालदार सयाजी चव्हाण व त्यांच्या सहकाºयांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेThiefचोरTempleमंदिरPoliceपोलिसArrestअटक