नदी पात्रातून वाळूची चोरी; गुन्हा दाखल, पोलिसांनी ट्रॅक्टरच केला जप्त

By रोहित टेके | Updated: March 4, 2023 13:11 IST2023-03-04T13:11:18+5:302023-03-04T13:11:53+5:30

आकाश राजेंद्र मदने ( वय २३, वर्षे रा. महेश्वरनगर, कोळपेवाडी ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Theft of sand from the riverbed, the police seized the tractor itself kopargaon | नदी पात्रातून वाळूची चोरी; गुन्हा दाखल, पोलिसांनी ट्रॅक्टरच केला जप्त

नदी पात्रातून वाळूची चोरी; गुन्हा दाखल, पोलिसांनी ट्रॅक्टरच केला जप्त

कोपरगाव : (जि. अहमदनगर) तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक्टर कोपरगाव तालुका पोलसांनी शनिवारी (दि.४) पहाटे २ वाजताच्या सुमारास कारवाई करीत पकडला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे यांनी आकाश राजेंद्र मदने ( वय २३, वर्षे रा. महेश्वरनगर, कोळपेवाडी ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

या कारवाईत स्वराज कंपनीच्या विना क्रमांकाच्या २ लाख ५० हजार किमतीच्या ट्रक्टर-ट्रोलीसह १० हजार किमतीची वाळू अस एकूण २ लाख ६० हजारांचा मुदेमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हि कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब वाखुरे, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, अंबादास वाघ यांनी केली.

Web Title: Theft of sand from the riverbed, the police seized the tractor itself kopargaon