शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 19:03 IST

ग्रामस्थ आल्यानंतर चोर घाबरून पळू लागले. यातील एक चोर गुफरान अहमद याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील पइन्सा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या निवृत्त न्यायाधीशाच्या घरात चोरीची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेत चार चोरांनी घरात घुसून सर्व ऐवज लंपास केला. सुरेश चंद्र हे आपल्या कुटुंबासह लखनौमध्ये राहत आहेत. शेजारी राहणाऱ्या अमित कुमार यांना काही संशयास्पद हालचाली जाणवल्या, त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना बोलावलं.

ग्रामस्थ आल्यानंतर चोर घाबरून पळू लागले. यातील एक चोर गुफरान अहमद याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर इतर चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी गुफरानला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून त्याची रवानगी जेलमध्ये केली असून चौकशी सुरू केली आहे.

यावेळी घटनास्थळाजवळील तलावात अरबाज नावाच्या चोराचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पळताना अरबाजने तलावात उडी मारली आणि रात्रीच्या अंधारात बाहेर येऊ न शकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि घटनेची माहिती मृताच्या कुटुंबीयांना दिली.

याप्रकरणी एसपी ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन हद्दीत चार चोरांनी चोरीसाठी घरात घुसखोरी केली होती. गावकऱ्यांनी एका चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं, तर पळून जात असताना दुसरा चोर तलावात पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. इतर फरार चोरांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीThiefचोरPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश