पोलीस उपायुक्तांच्या सायकलची चोरी, ठाण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:06 IST2020-07-09T00:06:19+5:302020-07-09T00:06:44+5:30

कोपरी येथील १२ बंगलामधील ‘अक्षय’ या बंगला क्रमांक १६ येथे उभी केलेली पोलीस उपायुक्तांची हिरव्या रंगाची ३० हजारांची एका नामांकित कंपनीची सायकल ५ जुलै रोजी रात्री ९ ते ६ जुलै रोजी सकाळी १० या दरम्यान चोरीस गेली.

Theft of Deputy Commissioner of Police's bicycle, incident in Thane | पोलीस उपायुक्तांच्या सायकलची चोरी, ठाण्यातील घटना

पोलीस उपायुक्तांच्या सायकलची चोरी, ठाण्यातील घटना

ठाणे : वाहनचोरीच्या घटना एरव्ही रोजच ठाण्यात दाखल होत असतात. मंगळवारी कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दस्तुरखुद्द पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याच सायकलीची चोरी झाल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल संदीप वाघ यांनी दाखल केली आहे. अर्थात, ही चोरी नसून ती ज्याला वापरायला दिली, त्याने ती परत केली नाही. तो लवकरच परत करणार असल्याचा दावा कोपरी पोलिसांनी केला आहे.

यासंदर्भात कोपरी पोलीस ठाण्यात उपायुक्त ांचे गार्ड वाघ यांनी ७ जुलै रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कोपरी येथील १२ बंगलामधील ‘अक्षय’ या बंगला क्रमांक १६ येथे उभी केलेली पोलीस उपायुक्तांची हिरव्या रंगाची ३० हजारांची एका नामांकित कंपनीची सायकल ५ जुलै रोजी रात्री ९ ते ६ जुलै रोजी सकाळी १० या दरम्यान चोरीस गेली.

या काळात काळे यांच्या बंगल्यावर पोलीस शिपाई (क्र. ६६३३) हे ड्युटीवर होते. चोरट्याने तक्रारदार तसेच काळे यांच्या संमतीशिवाय त्यांची ही सायकल चोरून नेली आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर. जी. आंब्रे हे अधिक तपास करीत आहेत. ही सायकल उपायुक्त काळे यांच्या ओळखीतील एकाने नेली असून ती लवकरच परत मिळेल, असा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी केला.

होय, हे खरे आहे. पण, घरात काम करणाऱ्या एका नोकराच्या नातेवाइकाने ती नेली आहे. दोन दिवस वाट पाहूनही तो न आल्याने याबाबत तक्रार दाखल केली. तसा यात बातमीचा विषय नाही.
- अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा

Web Title: Theft of Deputy Commissioner of Police's bicycle, incident in Thane