अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाने घेतला गळफास
By महेश सायखेडे | Updated: August 7, 2022 17:07 IST2022-08-07T17:06:45+5:302022-08-07T17:07:40+5:30
Suicide Case : निखिल अवधूत नेहारे (३०) रा. भिडी असे मृताचे नाव आहे.

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाने घेतला गळफास
वर्धा : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून निखिल अवधूत नेहारे (३०) रा. भिडी असे मृताचे नाव आहे.
निखिलचा भाऊ गोठ्यात गेला असता त्याला निखिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना तसेच देवळी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तिरुपती राणे तसेच धम्मा मानकर यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी देवळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
मेडिकलमध्ये करायचा काम
गरिबीची परिस्थिती असलेल्या निखिल याने आपले शिक्षण पूर्ण केले. पण शिक्षणाच्या जोरावरच पाहिजे तशी नोकरी त्याला मिळाली नाही. पण तो एका मेडिकल मध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून वृत्त लिहिस्तोवर निखिलच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.