"मला घरी बोलावलं अन् बळजबरीनं संबंध बनवले, त्यानंतर..."; युवकावर घडला अतिप्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 15:59 IST2023-04-16T15:58:13+5:302023-04-16T15:59:30+5:30

या प्रकारानंतर युवक पोलीस अधीक्षकांना भेटला आणि त्यांना ही बाब सांगितली.

The woman blackmailed the youth in honey trap case at haryana | "मला घरी बोलावलं अन् बळजबरीनं संबंध बनवले, त्यानंतर..."; युवकावर घडला अतिप्रसंग

"मला घरी बोलावलं अन् बळजबरीनं संबंध बनवले, त्यानंतर..."; युवकावर घडला अतिप्रसंग

हरियाणाच्या महेंद्रगड इथं हनीट्रॅपचा हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एका महिलेने युवकाला गोड बोलून त्याच्या घरी बोलावले. त्यानंतर बळजबरीने त्याच्यासोबत संबंध ठेवले. इतकेच नाही तर त्याचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर युवक जेव्हा घरी जायला निघाला तेव्हा त्याला ब्लॅकमेल करण्यास महिलेने सुरूवात केली. 

पीडित युवकाने सांगितले की, मागील काही दिवसांपासून माझ्या नंबरवर अज्ञात कॉल येत होता. हा कॉल एका महिलेचा होता. तिने ५-६ वेळा मला कॉल करून भेटण्यासाठी तिच्या घरी बोलावले. या महिलेवर भरवसा ठेवत मी तिच्या घरी गेलो. घरी पोहचल्यावर महिलेने बळजबरीने माझ्याशी शारिरीक संबंध बनवले. जेव्हा मी घरातून बाहेर जायला लागलो तेव्हा तिने मला व्हिडिओ दाखवून १० लाख रुपये दे अशी मागणी केली. हे पाहून मला धक्का बसला. त्यावेळी मी गळ्यातील सोन्याची चैन आणि ब्रॅसलेट काढून महिलेला दिले. 

या प्रकारानंतर युवक पोलीस अधीक्षकांना भेटला आणि त्यांना ही बाब सांगितली. शनिवारी सकाळी जेव्हा महिलेने पुन्हा युवकाला फोन केला आणि पैशांची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी सापळा रचून युवकाला १ लाख रुपये देत नोटांचे नंबर लिहिण्यात आले. युवकाने महिलेला पैसे दिले तसे सापळा रचलेल्या पोलिसांनी तिला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी हनीट्रॅपची तक्रार नोंदवत महिलेला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

Web Title: The woman blackmailed the youth in honey trap case at haryana