शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पत्नीनं घेतला पुरुषत्वावर संशय, गर्भवती राहिल्यानंतर पतीनं घेतला क्रूर बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 22:40 IST

Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी याबाबत खुलासा केला आहे.

हरदोई - उत्तर प्रदेशातील  हरदोईच्या माझिला पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपली पत्नी दुसऱ्याच्या मुलाची आई होणार असल्याचा संशय आल्याने एका तरुणाने आपल्याच पत्नीची हत्या केली. त्याचा असा समज होता की, त्याच्या पत्नीने 4 वर्षांपूर्वी ज्या मुलाला जन्म दिला तो त्याचा नाही आणि आता ती पुन्हा गर्भवती आहे, पोटात वाढणारा वंश देखील त्याचानाही. या तरुणाने स्वत:ला समजावले आणि पत्नी गरोदर असल्याचे त्याला संशय आल्याने त्याने पत्नीला शपथ घेण्यासाठी समाधीजवळ नेले. यादरम्यान त्याने पत्नीचा गळा चिरून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी याबाबत खुलासा केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी  मझिला  पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. प्रीती राम सेवक असे या महिलेचे नाव असून ती त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंजहाई गावातील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या आईच्या तक्रारीवरून मयताचा पती रामसेवक याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून फरार रामसेवकाला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले होते. एसपीने सांगितले की, जेव्हा पोलिसांच्या पथकाने रामसेवकला अटक केली तेव्हा त्याने पत्नीच्या हत्येचा गुन्हा मान्य केला  आणि जेव्हा त्याने हत्येचे कारण सांगितले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रामसेवकाचा विवाह प्रीतीसोबत 8 वर्षांपूर्वी झाला होता. प्रीतीसोबत त्याला ४ वर्षांचा मुलगा असून त्याचे नाव अंशू आहे. प्रीती पतीसोबत कमी राहत होती. तिचे सासरे सीतापूर आणि आता लखनौच्या त्रिवेणीनगर येथे राहत होते. इकडे प्रीती पुन्हा गरोदर राहिली तेव्हा रामसेवकाच्या मनात आले की, हे मूल आपले नाही. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला असता, महिलेने पतीला पुरुषत्वावरून शिवीगाळ केली. त्यामुळे रामसेवकाने आपल्या पत्नीला मारण्याचा निर्णय घेतला. 27 मार्च रोजी सकाळी रामसेवक याने आपल्या भावाची मोटारसायकल घेऊन कुऱ्हाड घेऊन समाधीजवळ लपवून ठेवली. लखनौमध्ये पत्नीची माफी मागून तो रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नी आणि मुलासह शहीद बाबांच्या समाधीवर पोहोचला. येथे त्याने पत्नीला शपथ घेण्यास सांगितले की, त्याचे कोणाशीही प्रेमसंबंध नाही. याप्रकरणी शपथ घेण्यास नकार दिल्याने रामसेवकने आधीच लपवून ठेवलेली कुऱ्हाड काढून पत्नीवर हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.पत्नीची हत्या केल्यानंतर तो मुलगा अंशूसोबत घरी पोहोचला आणि रक्ताने माखलेले कपडे आणि शूज खोलीत लपवून ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या मोटारसायकलसह पोलिसांनी त्याला अटक केली तीच मोटरसायकल त्या दिवशी खुनाच्या प्रकरणात वापरली होती. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडेही जप्त केले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकPregnancyप्रेग्नंसी