घरासमोर गाणे का लावता, विचारल्यानं चिडून तिघांनी महिलेचं डोकं फोडलं

By विलास जळकोटकर | Updated: March 1, 2024 17:06 IST2024-03-01T17:06:34+5:302024-03-01T17:06:38+5:30

मोठमोठ्याने गाण्याच्या आवाजानं तिनं समोर थांबलेल्या लोकांना विचारणा केली.

The three got angry and smashed the woman's head after asking why they were playing in front of the house | घरासमोर गाणे का लावता, विचारल्यानं चिडून तिघांनी महिलेचं डोकं फोडलं

घरासमोर गाणे का लावता, विचारल्यानं चिडून तिघांनी महिलेचं डोकं फोडलं

सोलापूर : किरकोळ कारणावरुनही भांडणतंट्याचे प्रकार वाढले आहेत. सोलापुरातील लष्कर परिसरात एका महिलेनं घरासमोर गाणे का लावता अशी विचारणा केल्यानं तिघांची चिडून तिच्या डोक्यात फरशी मारुन जखमी केले. लाथाबुक्क्यांनी बेदम चोप दिला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. जया मुकेश बुऱ्हाणपुरे (वय- ३९ , रा. लष्कर, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. यातील जखमी महिला जया ही गुरुवारी रात्री घरासमोर थांबलेली होती.

मोठमोठ्याने गाण्याच्या आवाजानं तिनं समोर थांबलेल्या लोकांना विचारणा केली. या तिघांनी चिडून भांडण सुरु केले. एकानं बाजूलाच असलेली फरशी उचलून महिलेच्या डोक्यात मारली. यामुळे भळाभळा रक्त येऊ लागले. अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम चोप दिला. जखमी महिलेला तिचा दीर रमेश बुऱ्हाणपुरे याने उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: The three got angry and smashed the woman's head after asking why they were playing in front of the house