अल्पवयीन मुलाकडे सापडलेला अवैध औषधाचा साठा जप्त, साडेपाच हजाराचा मुद्देमाल जप्त
By देवेंद्र पाठक | Updated: March 19, 2023 16:36 IST2023-03-19T16:35:47+5:302023-03-19T16:36:25+5:30
धुळे : शहरातील वडजाई रोडवरील भोईवाडा भागात एका अल्पवयीन मुलाला अवैध औषधांच्या साठ्यासह पकडण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले. ...

अल्पवयीन मुलाकडे सापडलेला अवैध औषधाचा साठा जप्त, साडेपाच हजाराचा मुद्देमाल जप्त
धुळे : शहरातील वडजाई रोडवरील भोईवाडा भागात एका अल्पवयीन मुलाला अवैध औषधांच्या साठ्यासह पकडण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले. त्याच्याकडून ५ हजार ५५४ रुपये किंमतीचा विना परवाना औषधांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. शहरातील वडजाई रोड भागातील भोईवाडा परिसरात एक अल्पवयीन मुलगा फिरत आहे. त्याच्याकडे औषध साठा असून तो बेकायदेशीर आहे. परवानगी नसताना तो औषधे छुप्या पद्धतीने विकत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांना मिळाली होती.
ही माहिती मिळताच पथकाला रवाना करण्यात आले. पथकाने भाेईवाडा परिसरात शुक्रवारी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास सापळा लावून १७ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला पकडले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे विनापरवानगी औषधांचा साठा आढळून आला. तो सर्व जप्त करण्यात आला असून मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक संदीप ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत.
दरम्यान, ही औषधे मुलाने आणले कुठून, कोणाला विकणार होता. यासह अनुषंगिक बाबींची चौकशी पोलिस निरीक्षक धीरज महाजन करीत आहेत.