गायक तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; तरुणांनी खोलीत बंद करून दोघांनाही चोपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 19:59 IST2023-07-21T19:58:46+5:302023-07-21T19:59:03+5:30
मारहाण आणि व्हिडीओ व्हायरलची माहिती मिळताच पोलीस अॅक्टिव्ह झाली असून पीडितेची चौकशी करून तिला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले आहे.

गायक तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; तरुणांनी खोलीत बंद करून दोघांनाही चोपले
बिहारच्या बेगुसरायमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका लोक गायकाला एका तरुणीसोबत विवस्त्रावस्थेत पकडण्य़ात आले आहे, यानंतर जमावाने त्या दोघांना नग्नावस्थेत एका खोलीत बंद करून मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
मारहाण आणि व्हिडीओ व्हायरलची माहिती मिळताच पोलीस अॅक्टिव्ह झाली असून पीडितेची चौकशी करून तिला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले आहे. लोक गायक किशन चौरसिया हा हार्मोनियम शिकविण्याच्या बहाण्याने एका तरुणीला एकांतात घेऊन गेला होता. हे बऱ्याच दिवसांपासून सुरु होते. यामुळे ग्रामस्थांनी दोघांवर नजर ठेवली आणि नग्नावस्थेत दोघांना रंगेहाथ पकडले व मारहाण केली.
पोलिसांनी लोक गायकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोबतच मारहाण करणाऱ्या तरुणांवरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हायरल व्हिडीओत गायक आणि ती तरुणी संबंध ठेवताना दिसत आहेत. यानंतर काही लोक त्यांना मारहाण करत आहेत. तरुणी माफी मागत आहे व स्वत:ला कपड्यांनी झाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मारहाण करणारे तरुण तिला रोखत आहेत, हे त्या व्हिडीओत दिसत आहेत.
चाळीशीच्या आसपास वय असलेला गायक चौरसिया हा गावात कीर्तन, भजनाचे काम करतो. तसेच हार्मोनियम देखील शिकवतो. त्याचे शेजारी राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याच मुलीला तो घेऊन गेला होता.