सायबर भामट्यांचा ‘शेअर’ वाढला; शेअर मार्केटच्या आड ८५६ गुन्हे; ज्येष्ठ नागरिक अडकले जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 09:24 IST2026-01-20T09:24:03+5:302026-01-20T09:24:41+5:30

सुशिक्षितांनाही ओढले जाळ्यात; मुंबई पाेलिसांकडून ४,८२५ गुन्ह्यांची नोंद

The 'share' of cyber fraudsters has increased 856 crimes committed against the stock market; Senior citizens caught in the net | सायबर भामट्यांचा ‘शेअर’ वाढला; शेअर मार्केटच्या आड ८५६ गुन्हे; ज्येष्ठ नागरिक अडकले जाळ्यात

सायबर भामट्यांचा ‘शेअर’ वाढला; शेअर मार्केटच्या आड ८५६ गुन्हे; ज्येष्ठ नागरिक अडकले जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आजच्या डिजिटल युगात गुंतवणुकीचे स्वरूप वेगाने बदलत आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सी किंवा विदेशी चलन या सर्व क्षेत्रांमध्ये ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. मात्र, या सोयी-सुविधांच्या आडून गुंतवणुकीच्या नावाखाली लपलेले सायबर संकट वेळीच ओळखणे गरजेचे बनले आहे. यात विशेषतः ज्येष्ठ नागरिक, निवृत्त व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर वयस्कर लोकांना टार्गेट करण्यात येत असून, ही चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षभरात सायबरशी संबंधित ४ हजार ८२५ गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये शेअर मार्केट फसवणुकीच्या सर्वाधिक ८५६ गुन्ह्यांचा समावेश आहे.

गुंतवणुकीसाठी शेअर ट्रेडिंगकडे जाणाऱ्यांचा ओढा वाढला. याच चढाओढीत सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. दिवसाआड शेअर, क्रिप्टो ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची लूट होत असताना सायबर भामट्यानी डेटिंग ॲपवरूनही शेअर ट्रेडिंगचे जाळे पसरवल्याने चिंतेत भर पडली आहे. डेटिंग ॲपवरून ओळख करायची. सावजाला मधाळ संवादात अडकवून जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे.   यापूर्वी डेटिंग ॲपद्वारे जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करत खंडणी उकळल्याच्या घटना समोर येत होत्या. त्यात शेअर ट्रेडिंगची वाढती क्रेझ पाहून डेटिंग ॲपद्वारेही जाळे पसरवण्यास सुरुवात केली आहे.

१,४१० भामट्यांना अटक

जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान सायबरशी संबंधित मुंबईत ४,८२५ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी १५४२ गुन्ह्यांची उकल होत १४१० भामट्यांना अटक केली आहे. यामध्ये सर्वाधिक शेअर मार्केट गुंतवणुकीच्या ८५६ गुन्ह्यांचा समावेश आहे. २४८ गुन्ह्यांची उकल करत २९७ जण जाळ्यात अडकले आहेत. 

एकाच बँक खात्याचा लुटीसाठी वापर

शेअर ट्रेडिंग फसवणुकीसाठी वापरलेल्या एकाच बँक खात्याचा एकाचवेळी देशभरातून ४० ते ५० सायबर गुन्ह्यांसाठी वापर होत असल्याचेही पोलिस कारवाईतून समोर येत आहे. सायबर पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत आरोपीच्या बँक खात्याचा अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये वापर झाल्याचे  स्पष्ट झाले आहे.  

गुंतवणुकीचे आमिष, ५८ जण अटकेत

गुंतवणूक फसवणुकीच्या २६६ गुन्ह्यांची नोंद झाली असून, ५८ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी एकूण गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचा आकडा ११६० होता. उच्चशिक्षित, व्यावसायिक मंडळींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सतर्क होत पावले उचलणे गरजेचे आहे. 

डिजिटल अटक अन् बरंच काही

गेल्या वर्षात डिजिटल अटकेचे १९१ गुन्हे नोंद झाले. तर नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे ३०३ गुन्हे दाखल झाले आहेत.  क्रेडिट कार्ड/ऑनलाईन फ्रॉडचे ६५५ गुन्हे दाखल झाले असून, १३३ जणांना अटक केली आहे.

Web Title : शेयर बाजार में साइबर धोखाधड़ी बढ़ी; वरिष्ठ नागरिक निशाना, 856 मामले

Web Summary : शेयर बाजार में साइबर धोखाधड़ी बढ़ रही है, 856 मामले दर्ज। वरिष्ठ नागरिक मुख्य निशाना हैं। डेटिंग ऐप्स का इस्तेमाल घोटाले के लिए, उच्च रिटर्न का वादा। पुलिस ने 4,825 मामलों से जुड़े 1410 धोखेबाजों को गिरफ्तार किया।

Web Title : Cyber Frauds Increase in Share Market; Seniors Targeted, 856 Cases

Web Summary : Cyber frauds are increasing in the share market, with 856 cases reported. Seniors are primary targets. Dating apps are used for scams, promising high returns. Police arrested 1410 fraudsters related to 4,825 cases, highlighting investment scams.