दुसऱ्याकडून करारावर घेतलेली रिक्षाच गेली चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:44 IST2022-08-08T14:44:14+5:302022-08-08T14:44:37+5:30

कुंभारीतील घटना; पहाटेच्या सुमारास आली घटना समोर

The rickshaw taken on contract from someone else was stolen | दुसऱ्याकडून करारावर घेतलेली रिक्षाच गेली चोरीला

दुसऱ्याकडून करारावर घेतलेली रिक्षाच गेली चोरीला

- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पाच वर्षासाठी करारावर चालविण्यास घेतलेली रिक्षा घरासमोर लावल्यावर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत वळसंग पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहसीन कबुला हुसेनी (३०, रा. नवीन विडी घरकुल, कुंभारी, ता.द.सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हरिसिंग उध्दव सिंग (बुर्हाणपुरे, रा. लष्कर, सोलापूर) यांची एमएच १३ सीटी ७९११ ही रिक्षा आहे. ही रिक्षा मोहसीन पिरजादे यांना पाच वर्षासाठी करारावर दिली होती. यातील तीन वर्ष पूर्ण झाली. मोहसीन हे नेहमी सोलापूर शहरात प्रवासी वाहतूक करीत होते.

६ ऑगस्ट २०२२ रोजी दिवसभर व्यवसाय करून रात्री आठच्या सुमारास विडी घरकुल येथील घरासमोर लावली होती. रात्री झोपल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घरासमोर लावलेली रिक्षा चाेरून नेली. सकाळी उठताच ही बाब लक्षात आल्यानंतर मोहसीन यांनी तात्काळ वळसंग पोलिसात फिर्याद दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.

Web Title: The rickshaw taken on contract from someone else was stolen

टॅग्स :Policeपोलिस