शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बकरीच्या साक्षीनं रेप-मर्डर केस सॉल्व्ह, आरोपीला ठोठावण्यात आली जन्मठेपेची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 08:16 IST

जवळपास 4 वर्षे हा खटला चालला. या प्रकरणाची सुनावणी करताना नूह येथील न्यायालयाने वेगवेगळ्या कलमांतर्गत आरोपीला 75 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

हर‍ियाणातील नूह जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या 7 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्याला न्यायालयाने आजीवन कारावासाचीशिक्षा सुनावली आहे. जवळपास 4 वर्षे हा खटला चालला. या प्रकरणाची सुनावणी करताना नूह येथील न्यायालयाने वेगवेगळ्या कलमांतर्गत आरोपीला 75 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 26 डिसेंबर 2019 रोजी ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती. 

अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी 27 डिसेंबर 2019 रोजी फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्यात, आपल्या 7 वर्षांच्या मुलीवर कुणी तरी अत्याचार करून तिची हत्या केल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर, पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. 

शेळ्या चरायला गेली होती चिमुकली - प्रकरणातील वकील आकाश तंवर यांनी म्हटले आहे की, पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार करत म्हटले होते की, त्यांची 7 वर्षीय चिमुकली 26 डिसेंबर 2019 रोजी रोजच्या प्रमाणेच गावा जवळील डोंगरांवर शेळ्या चारण्यासाठी गेली होती. दुसऱ्या दिवशी काही लोकांसोबत तिचा शोध घेतला असता ती झुडपात मृतावस्थेचत पडलेली होती. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत - घटनेचा तपास करताना पोलिसांच्या चमूंकडून जवळफासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तपासणी केली. यात एक युवक शेळी घेऊन जाताना दिसत आहे. पीडितेच्या वडिलांना जेव्हा हे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यांची बकरी ओळखली. आरोपीची ओळख पटल्यानंतर, पुलिसांनी आरोपी मुकीम उर्फ मुक्कीला अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेपHaryanaहरयाणाCourtन्यायालयPoliceपोलिस