अमानुषपणा! रिक्षात बसलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचा घेतला जीव, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 18:58 IST2022-05-23T18:49:35+5:302022-05-23T18:58:54+5:30

Crime News : धर्मा कुंठे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून हा प्रकार रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडला.

The puppy sitting in the rickshaw driver took the life, filed a crime | अमानुषपणा! रिक्षात बसलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचा घेतला जीव, गुन्हा दाखल

अमानुषपणा! रिक्षात बसलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचा घेतला जीव, गुन्हा दाखल

सदानंद नाईक

उल्हासनगर : कुत्र्याचे पिल्लू ऑटो रिक्षात बसलं या रागातून अमानुषपणे पिल्याला मारहाण करून जीवे ठार केले. याप्रकरणी प्राणीमित्राच्या तक्रारीवरून धर्मा कुंठे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून हा प्रकार रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडला.

उल्हासनगर कॅम्प नं-१ डॉ संजय अहिरे यांच्या क्लिनिकसमोर धर्मा कुंठे ऑटो रिक्षा उभी करतात. रविवारी रिक्षा काढण्यास निघालेल्या धर्मा कुंठे यांना एक कुत्र्याचे पिल्लू रिक्षात बसलेले दिसले. कुत्र्याचे पिल्लू रिक्षात नेहमी बसते, या रागातून लाकडी दांडक्याने, अमानुषपणे कुत्र्याच्या पिल्यास त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला सोडण्या ऐवजी जीवेठार केले.

याप्रकारचा परिसरातील नागरिकांनी निषेध केला. तर कुत्र्याचे अन्न विक्रीचा व्यवसाय करणारे राज वोटवानीयांच्या तक्रारीवारीन उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कुत्र्याला अमानुषपणा  मारहाण करून जीवेठार मारल्या प्रकरणी सर्वत्र निषेध होत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The puppy sitting in the rickshaw driver took the life, filed a crime