हातात मेहंदी, गळ्यात दुपट्टा, सुटकेसमध्ये मृतदेह...; हिमानी नरवालच्या मृत्यूचं गूढ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 08:02 IST2025-03-02T08:01:51+5:302025-03-02T08:02:28+5:30

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांनीही या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली. 

The mystery of the murder of Congress leader Himani Narwal in Haryana remains | हातात मेहंदी, गळ्यात दुपट्टा, सुटकेसमध्ये मृतदेह...; हिमानी नरवालच्या मृत्यूचं गूढ कायम

हातात मेहंदी, गळ्यात दुपट्टा, सुटकेसमध्ये मृतदेह...; हिमानी नरवालच्या मृत्यूचं गूढ कायम

रोहतक - नेहमीप्रमाणे हरियाणाच्या रोहतक शहरातील सांपला बस स्टँडवर लोकांची गर्दी होती. अचानक एकाची नजर रस्त्याशेजारी जमिनीवर पडलेल्या एका निळ्या रंगाच्या मोठ्या सुटकेसवर पडली. उत्सुकतेपोटी काही जण बॅगेच्या जवळ गेले, परंतु मनात शंका असल्याने त्यांनी पोलिसांना कळवलं. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी जेव्हा सुटकेस उघडली तेव्हा पोलिसांसह तिथे बघणारे लोक होते त्यांच्या अंगावर काटा आला. सुटकेसमध्ये एका युवतीचा मृतदेह आढळून आला.

हातात मेहंदी, गळ्यात काळ्या रंगाचा दुपट्टा, शरीरावर सफेद रंगाचा टॉप आणि लाल रंगाची पँट, युवतीचा मृतदेह पाहून कुणीतरी तिचा गळा दाबून खून केल्यानंतर सुटकेसमध्ये मृतदेह ठेवून निघून गेल्याचा संशय पोलिसांना आला. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पोहचली परंतु दुपारपर्यंत मृत युवतीची ओळख पटली नाही. त्यामुळे मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला. या घटनेने गजबजलेल्या परिसरात खळबळ उडाली होती. 

आमदाराने मृतदेहाची ओळख पटवली

या प्रकारात काही लोकांनी मृत युवतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेची माहिती रोहतकचे आमदार बीबी बत्रा यांना मिळाली. त्यांनी मृत युवतीची ओळख पटवली. या युवतीचं नाव हिमानी नरवाल असं होते. ती काँग्रेसची सक्रीय कार्यकर्ता होती. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात ती हिरारीने सहभाग घ्यायची. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही तिने सहभाग घेतला होता. तिने अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. 

या युवतीच्या मृत्यूनंतर आमदार बीबी बत्रा यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली. हरियाणात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची भीती नाही. त्यामुळे अशा घटना वारंवार होत आहेत असा आरोप त्यांनी केला. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांनीही या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली. 

वडिलांनी केलं होतं सुसाईड, भावाची झाली होती हत्या

दरम्यान, प्राथमिक तपासात युवतीची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवल्याचं आढळून आले. हिमानी नरवालच्या वडिलांनी काही वर्षापूर्वी सुसाईड केले होते तर तिच्या एका भावाची हत्या करण्यात आली होती अशीही माहिती तपासात समोर येत आहे.

Web Title: The mystery of the murder of Congress leader Himani Narwal in Haryana remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.