बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाचा खून; नारळ सोलण्याच्या हत्याराने केला वार

By आशपाक पठाण | Updated: December 24, 2022 22:41 IST2022-12-24T22:41:32+5:302022-12-24T22:41:49+5:30

बबलू बागवान यांने नारळ छिलन्याच्या हत्याराने अखिल व बबलू भातांब्रे यांच्यावर हल्ला केला.

The murder of a young man who asked for an answer for breaking his sister's marriage; He was stabbed with a coconut peeling tool | बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाचा खून; नारळ सोलण्याच्या हत्याराने केला वार

बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाचा खून; नारळ सोलण्याच्या हत्याराने केला वार

औराद शहाजनी, (जि. लातूर) : बहिणीची सोयरीक मोडल्याच्या कारणास्तव विचारपूस करण्यास गेलेल्या तरुणावर केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

यासंदर्भात सपोनि. संदीप कामत यांनी सांगितले, औराद शहाजनी येथील अखिल जलील बेलुरे (२५) व त्याचा मित्र बबलू लायक भातांब्रे (२४) हे दोघेजण अखिलच्या बहिणीची सोयरिक मोडल्या कारणास्तव जाब विचारण्यासाठी लातूर-जहिराबाद या महामार्गारावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या बबलू महेताबसाब बागवान (२५) याच्याकडे सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान गेले होते. यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

बबलू बागवान यांने नारळ छिलन्याच्या हत्याराने अखिल व बबलू भातांब्रे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अखिल व भातांब्रे गंभीर जखमी झाले. अखिल बेलुरे यास पुढील उपचारासाठी निलंगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच निलंगा येथील डॉक्टरांनी अखिल यास मयत घोषित केले, तसेच बबलू भातांब्रे यास येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करण्यात आले. याप्रकरणातील हल्लेखोरही जखमी झाला आहे. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनास्थळी पोलिस बंदोबस्त...

भरचौकात तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सपोनि. संदीप कामत, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे यांच्यासह पोलिस उपस्थित होते. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्याचे सपोनि. कामत यांनी सांगितले.

Web Title: The murder of a young man who asked for an answer for breaking his sister's marriage; He was stabbed with a coconut peeling tool