शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
3
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
4
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
5
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
6
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
7
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
8
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
9
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
10
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
11
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
12
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
13
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
14
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
15
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
16
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
18
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
19
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
20
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत एकमेकांकडे रागाने बघण्यावरून तरुणाचा खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 00:29 IST

गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साखर कारखान्याच्या प्रवेशव्दारातच हा प्रकार घडला. संजयनगर पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले आहे.

सांगली: एकमेकांकडे रागाने बघण्यावरून शहरातील साखर कारखाना परिसरात महाविद्यालयीन तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. राजवर्धन रामा पाटील (वय १८, रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो येथील आयटीआयमध्ये शिकत होता. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साखर कारखान्याच्या प्रवेशव्दारातच हा प्रकार घडला. संजयनगर पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले आहे.

मूळचा मतकुणकी येथील राजवर्धन औद्योगिक वसाहतीमधील आयटीआयमध्ये प्रथम वर्षात होता. शिक्षणानिमित्त तो बुधगाव येथील नातेवाईकांकडे राहण्यास होता. दररोज सायंकाळी कारखान्याच्या थांब्यावरून तो बसने घरी जात असे. संशयित हल्लेखोर आणि त्याच्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांकडे रागाने बघण्यावरून वाद झाला होता.गुरूवारी राजवर्धन महाविद्यालयात आला होता व सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो कारखाना परिसरातून जात होता. यावेळी त्याचा एक मित्रही सोबत होता. यावेळी संशयित आणि राजवर्धन यांच्यात पुन्हा एकदा एकमेकांकडे बघण्याचा प्रकार घडला. यातूनच हल्लेखोरांनी त्याला कारखाना प्रवेशद्वाराजवळ बोलावून घेत त्याच्या मानेवर आणि छातीवर दोन वार केले. यात तो खाली कोसळला. त्यानंतर संशयितांनी तिथून पळ काढला.

सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर गर्दी असताना हा प्रकार घडल्याने घटनास्थळावर गर्दी झाली होती. यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले. खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तातडीने तपास करत तिघांना ताब्यात घेतले. संशयित आयटीआय परिसरात नेहमी असत. रागाने बघण्यावरून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चार दिवसात दुसरा खूनजानेवारीपासून शहरात एकाही खुनाची नोंद झाली नव्हती. मात्र, रविवारी वानलेसवाडी येथे जागेच्या वादातून महिलेचा खून करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या चारच दिवसात शहरात दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSangliसांगली