बापरे! भररस्त्यात बेवारस सूटकेसमध्ये सुरु होती हालचाल; उघडून पाहताच सगळेच झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 22:13 IST2022-02-02T22:12:49+5:302022-02-02T22:13:07+5:30
Crime News : बुधवारी दुपारी इंदूरच्या राऊ पोलीस स्टेशन परिसरातून जात असलेल्या एका व्यक्तीला एक बेवारस सुटकेस पडलेली दिसली. ती व्यक्ती त्याच्याजवळ पोहोचताच सुटकेस हलू लागली.

बापरे! भररस्त्यात बेवारस सूटकेसमध्ये सुरु होती हालचाल; उघडून पाहताच सगळेच झाले थक्क
इंदूर : मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेले इंदूर सध्या गुन्हेगारी राजधानी बनू लागली आहे. राऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एका अज्ञात सुटकेसमधून जिवंत बालक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात अफवा पसरली की लोकांनी एका मुलाला बंद सूटकेसमध्ये पाहिले आहे. मात्र, पोलिस तपासात प्रकरण वेगळेच असल्याचे समोर आले.
बुधवारी दुपारी इंदूरच्या राऊ पोलीस स्टेशन परिसरातून जात असलेल्या एका व्यक्तीला एक बेवारस सुटकेस पडलेली दिसली. ती व्यक्ती त्याच्याजवळ पोहोचताच सुटकेस हलू लागली. सदर व्यक्तीने सुटकेस उघडून पाहिल्यावर घटनास्थळी उपस्थित सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सुटकेसमधील पिशवीतून एक सात-आठ वर्षांचा मुलगा बाहेर आला, जो सुटकेस उघडताच जोरजोरात रडू लागला.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी या घटनेची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांना दिली आहे. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, त्यांनी मुलाला सोबत घेतले आणि सुटकेस जप्त केली. हे मूल कोठून आहे आणि ते कोणी घेऊन जात होते का?, याचा शोध पोलीस घेत आहेत.
सत्य काय आहे?
पोलीस तपासात हा मुलगा अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. आपल्या कुटुंबासह जवळच्या झोपडपट्टीत राहतात. खेळता खेळता मुलगा स्वत: सुटकेसमध्ये जवळ गेला होता. त्याच्या हालचालीमुळे सुटकेसचे झाकण बंद झाले होते. पोलिसांनी मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले आणि त्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. राऊ पोलीस ठाण्याचे टीआय यांनी सांगितले की, वडिलांना अंमली पदार्थांचे व्यसन आहे, त्यामुळे मुलाची काळजी घेण्यासाठी ते चाइल्ड लाईनला याबाबत पत्र लिहिणार आहेत.