महाड येथे पाेटच्या सहा मुलांना आईने विहिरीत ढकलले; पतीपत्नीच्या भांडणातून घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 08:45 IST2022-05-31T08:42:21+5:302022-05-31T08:45:02+5:30

महिला पाेलिसांच्या ताब्यात

The mother pushed our six children into a well in mahad | महाड येथे पाेटच्या सहा मुलांना आईने विहिरीत ढकलले; पतीपत्नीच्या भांडणातून घडली दुर्घटना

महाड येथे पाेटच्या सहा मुलांना आईने विहिरीत ढकलले; पतीपत्नीच्या भांडणातून घडली दुर्घटना

अलिबाग : महाड तालुक्यातील खरवली बोरगाव हद्दीमधील राहणारी आई आपल्या सहा मुलांसाठी वैरीण ठरली आहे. पतीपत्नीच्या भांडणात पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याबाबत रुना चिखुरी साहनी हिला महाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रुना हिने कोणत्या कारणामुळे या मुलांचा जीव घेतला याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. सहा मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. स्थानिक आमदार भरत गोगावले घटनास्थळी पोहोचले 
असून पोलीस यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने हे मृतदेह बाहेर काढले आहेत.

रोशनी चिखरू साहनी (१०), करिष्मा साहनी (८), रेश्मा साहनी (६), विद्या साहनी (५), शिवराज साहनी (३) आणि राधा साहनी (दीड वर्ष) अशी विहिरीत ढकलून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. आरोपी महिलेचा पती चिखुरी साहनी (३२) हा मेस्त्री काम करतो. साहनी कुटूंब हे मूळचे उत्तर प्रदेश मधील आहे. आरोपी पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The mother pushed our six children into a well in mahad