पसंत नसल्याने सासूने जावयाला जाळले; मुलगी ७ महिन्याची गरोदर असताना आईचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 06:13 IST2023-07-12T06:12:42+5:302023-07-12T06:13:13+5:30

विकास कुमार असे या जावयाचे नाव आहे. विकासने कर्णेजी गावातील नेहा कुमारी (१८) या तरुणीशी प्रेमविवाह केला.

The mother-in-law burned her son-in-law because she didn't like it at bihar | पसंत नसल्याने सासूने जावयाला जाळले; मुलगी ७ महिन्याची गरोदर असताना आईचा प्रताप

पसंत नसल्याने सासूने जावयाला जाळले; मुलगी ७ महिन्याची गरोदर असताना आईचा प्रताप

विभाष झा

पाटणा : पत्नी किंवा पती पसंत नसल्याने एखादा गुन्हा घडणे नवे नाही. मात्र, बिहारच्या वैशाली जिल्ह्यात जावई पसंत नसल्याने सासूने पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी घडली. विशेष म्हणजे मुलगी सात महिन्यांची गरोदर असताना आईने हा प्रताप केला.

अंगावरील कपड्यांनी पेट घेताच जावई जीवाच्या आकांताने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले व त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. विकास कुमार असे या जावयाचे नाव आहे. विकासने कर्णेजी गावातील नेहा कुमारी (१८) या तरुणीशी प्रेमविवाह केला. नेहा गर्भवती असल्याने माहेरी आली होती. तिला भेटण्यासाठी विकास कर्णेजीला आला. तेव्हा कोणत्या तरी कारणावरून त्याचा सासरच्या मंडळीसोबत वाद झाला. त्यामुळे विकास सासरहून निघून गेला होता. काही वेळाने पत्नीने त्याला फोन करून परत बोलावून घेतले.  तो परत आल्यानंतर सासूने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून  दिले. यात विकास ७५ टक्के भाजला आहे. 

Web Title: The mother-in-law burned her son-in-law because she didn't like it at bihar