खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 20:43 IST2025-10-30T20:42:20+5:302025-10-30T20:43:05+5:30
मृत चिमुकली सरकारी शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होती. ती आपल्या आई आणि आजीसोबत (आईची आई) राहत होती

खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल!
बेंगलोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे, एका तरुणाने, खासगी क्षणात अडथळा ठरत असलेल्या आपल्या प्रेयसीच्या सात वर्षांच्या मुलीचीच निर्घृन हत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर २६ वर्षीय आरोपी दर्शन कुमार यादव फरार झाला होता. मात्र कुंबलागुडू पोलिसांनी तक्रार मिळताच तपासाची चक्रे फिरवली आणि त्याला तुमकुरू रोडजवळ अटक केली.
मृत चिमुकली सरकारी शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होती. ती आपल्या आई आणि आजीसोबत (आईची आई) राहत होती. तिची आई एका खासगी कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करते. ती पतीपासून काही वर्षांपूर्वी विभक्त झाली होती. यानंतर तिची ओळख पेंट कंपनीत काम करणाऱ्या दर्शनशी झाली आणि त्यांच्यात जवळीक वाढली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात आजीच्या निधनानंतर आरोपीला ती लहान मुलगी अडथळा ठरू लागली. त्याने मुलीला हॉस्टेलमध्ये पाठवण्यासाठी दबाव टाकला, मात्र आईने नकार दिल्याने त्यांच्यातील वाद वाढला. आरोपी वारंवार मारहाण करत असे आणि दोघींना बरेवाईट करण्याची धमक्याही देत असे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबरच्या रात्री आरोपी प्रेमिकेच्या घरीच थांबला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुलीला घेऊन स्वतःच्या घरी गेला. यानंतर त्याने तिच्या आईला फोन करून लवकर घरी येण्यास सांगितले. ती सायंकाळी घरी आली, तोच आरोपीने तिच्यावर हल्ला करून तिला एका खोलीत बंद केले. यानंतर तिने तेथे तिच्या मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीचा गळा चिरून हत्या केली होती.