फेसबुक मेसेजला रिप्लाय करताच महिलेने केला नग्न व्हिडिओ कॉल; वकील अडकला जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 07:16 AM2024-01-22T07:16:32+5:302024-01-22T07:16:44+5:30

जुहू परिसरात राहणाऱ्या संबंधित वकिलाला १८ जानेवारीला रिया गोयल या फेसबुक अकाउंटवरून मेसेज आला.

The lawyer got caught in the trap of sextortion | फेसबुक मेसेजला रिप्लाय करताच महिलेने केला नग्न व्हिडिओ कॉल; वकील अडकला जाळ्यात

फेसबुक मेसेजला रिप्लाय करताच महिलेने केला नग्न व्हिडिओ कॉल; वकील अडकला जाळ्यात

मुंबई : जुहू परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय वकिलाला रिया गोयल या फेसबुक अकाउंटवरून मेसेज आला. त्याने त्यास प्रतिसाद देताच महिलेने नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. त्याचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी सुरू केली. भीतीने त्याने सुरुवातीला काही रक्कम पाठवली. मात्र मागणी वाढल्याने त्याने पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. 

जुहू परिसरात राहणाऱ्या संबंधित वकिलाला १८ जानेवारीला रिया गोयल या फेसबुक अकाउंटवरून मेसेज आला. त्याने प्रतिसाद देताच महिलेने नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरू झाला. सुरुवातीला वकिलाने घाबरून सहा हजार रुपये पाठवले. मात्र, सतत पैशांची मागणी होत असल्याने त्याने हे सत्र थांबविले. पैसे देणे बंद केल्यानंतर तक्रारदाराला शिवीगाळ सुरू झाली. काही दिवसांनी तक्रारदाराच्या शिक्षिकेचा फोटो व्हॉट्सअप प्रोफाइलवर ठेवून कुटुंबीयांना या व्हिडीओबाबत सांगणार असल्याचे धमकी देणारीने सांगितले. घाबरलेल्या तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पोलिस तपास करत आहेत. 

असा लावला जातो ट्रॅप
कुठलाही क्रमांक शोधून त्यावर स्वतःची जुजबी माहिती देणारा पहिला संदेश टाकला जातो. एखाद्याने कुतूहल म्हणून त्याला प्रतिसाद देताच,  गोड बोलून जवळीक साधण्यास सुरुवात होते मग तुम्ही केलेल्या सेक्स चॅटचा, तर कधी पाठवलेल्या न्यूड फोटोंच्या बदल्यात खंडणी मागितली जाते.

काय काळजी घ्याल...
अनोळखी व्यक्तींशी चॅट करण्याच्या मोहात पडू नका. वैयक्तिक माहिती कुणालाही शेअर करू नका. कुणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा. यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे .

Web Title: The lawyer got caught in the trap of sextortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.