पतीचा रंग काळा म्हणून पेट्रोल टाकून पेटवले, सौंदर्याचा अभिमान असलेल्या पत्नीला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 05:53 IST2023-11-08T05:53:33+5:302023-11-08T05:53:45+5:30

न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पत्नीला दोषी ठरवले. 

The husband was burnt with petrol because his color was black, the wife who was proud of her beauty was sentenced to life imprisonment | पतीचा रंग काळा म्हणून पेट्रोल टाकून पेटवले, सौंदर्याचा अभिमान असलेल्या पत्नीला जन्मठेप

पतीचा रंग काळा म्हणून पेट्रोल टाकून पेटवले, सौंदर्याचा अभिमान असलेल्या पत्नीला जन्मठेप

संभळ : पतीचा रंग काळा असल्याने संभळ येथे पत्नीने पतीला थेट जिवंत जाळून ठार केल्याच्या धक्कादायक घटनेत कोर्टाने पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नीला तिच्या सौंदर्याचा मोठा अभिमान होता.
पत्नी प्रत्येकवेळी बोलताना पतीचा अपमान करायची. तू माझ्यासोबत राहण्यासाठी लायक नाहीस. तू माझ्यापासून वेगळा हो, अशी ती धमकी देत असे. त्यानंतर एके दिवशी तिने घरात पेट्रोल ओतून नवऱ्याला जाळले. यात तडफडून त्याचा मृत्यू झाला. तब्बल ४ वर्षांनंतर न्यायालयाने या प्रकरणी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पत्नीला दोषी ठरवले. 

६ महिन्यांची मुलगी अन्...
सत्यवीरचा विवाह २०१७ मध्ये प्रेमश्रीशी झाला होता. नोव्हेंबर २०१८ मध्ये दोघांना मुलगी झाली होती. मुलगी ६ महिन्यांची असताना १५ एप्रिल २०१९ रोजी सत्यवीर यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांची हत्या करण्यात आली. कोर्टाच्या निर्णयावर मी समाधानी असल्याचे सत्यवीरचे वडील महेंद्र यांनी म्हटले.

Web Title: The husband was burnt with petrol because his color was black, the wife who was proud of her beauty was sentenced to life imprisonment