क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:48 IST2025-06-04T16:46:21+5:302025-06-04T16:48:19+5:30

चारित्र्यावर संशय घेत एका पतीने आपल्या पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

The height of cruelty! husband turned into a monster; Cut off wife's breasts, nose, ears and attacked her genitals | क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला

क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत एका पतीने आपल्या पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्या नाक, कान आणि छातीवर अनेक खोलवर वार करण्यात आले आहेत.

३५ वर्षीय सावित्रीबाई मंगळवारी तिच्या माहेरून सासरच्या घरी आली होती. त्यानंतर तिचा पती कमल वर्मा याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात कमलने घरातील चाकू उचलला आणि सावित्रीच्या नाक, कान आणि छातीवर ५-६ वेळा वार केले. या हल्ल्यामुळे सावित्रीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली.

शेजाऱ्यांनी वाचवले, पती फरार
सावित्रीबाईंच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावत त्यांच्या घरी आले, ज्यामुळे आरोपी कमल वर्मा घटनास्थळावरून पळून गेला. शेजाऱ्यांनी तातडीने सावित्रीबाईंना सारंगपूर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी शाजापूर येथे पाठवण्यात आले आहे.

पोलिसांची कारवाई
लिमाचौहान पोलीस स्टेशनचे प्रभारी अनिल राहोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाईंच्या तक्रारीवरून आरोपी पती कमल वर्मा विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची विविध पथके आरोपीचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची सखोल पाहणी देखील केली आहे.

लग्नापासूनच संशयाचे भूत
सावित्रीबाईंनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, लग्नापासूनच तिचा पती कमल वर्मा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि यावरून त्याने तिला यापूर्वीही अनेक वेळा मारहाण केली होती. या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाचा कळस या जीवघेण्या हल्ल्यात झाला. आरोपी कमल वर्मा सध्या फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Web Title: The height of cruelty! husband turned into a monster; Cut off wife's breasts, nose, ears and attacked her genitals