धक्कादायक! फक्त १० रुपयांसाठी निर्दयी बापाने आवळला तिचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 06:57 IST2023-12-05T06:57:38+5:302023-12-05T06:57:50+5:30

..मात्र, मुलीने पैसे मागणे न थांबवल्याने आरोपीने रागाच्या भरात मुलीचा शालने गळा आवळून खून केला. 

The heartless father killed Daughter for just 10 rupees in UP | धक्कादायक! फक्त १० रुपयांसाठी निर्दयी बापाने आवळला तिचा गळा

धक्कादायक! फक्त १० रुपयांसाठी निर्दयी बापाने आवळला तिचा गळा

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये अवघ्या १० रुपयांसाठी एका बापाने आपल्याच मुलीची गळा आवळून हत्या केली. एवढेच नाही तर आरोपी पित्याने मुलीचा मृतदेह अर्ध्या जळालेल्या अवस्थेत घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात फेकून दिला. सराय ख्वाजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खानापूर गावात बुधवारी घडलेली ही घटना सध्या व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. आझमगडमधील रहिवासी दहा वर्षीय रागिणी सोनकर बुधवारी तिचे वडील रिंकू सोनकर यांच्यासोबत खानापूरमध्ये विवाह सोहळ्यासाठी आली होती. सर्व नातेवाइकांसमोर रागिणीने वडिलांकडे १० रुपये मागायला सुरुवात केली. मात्र, रिंकूकडे केवळ जाण्यासाठी पैसे होते. त्यामुळे सुरुवातीला त्याने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने पैसे मागणे न थांबवल्याने आरोपीने रागाच्या भरात मुलीचा शालने गळा आवळून खून केला. 

Web Title: The heartless father killed Daughter for just 10 rupees in UP