शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शहरात जाऊन शिकण्याची इच्छा; मुलीने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:16 IST

कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार केली की, कॉलेजला जात असताना काही लोकांनी तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि तिला जखमीही केलं. प्रकरणाचं गांभीर्य पाहून स्थानिक आमदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात भरती असलेल्या विद्यार्थिनीला भेटायला पोहोचले. मात्र पोलीस तपासात हे संपूर्ण प्रकरण एक खोटी गोष्ट असल्याचं समोर आलं.

सुरुवातीला विद्यार्थिनीने दावा केला होता की, कारची नंबर प्लेट कपड्याने झाकलेली होती आणि त्यात तीन मास्क लावलेले लोक होते. अपहरणकर्ते तिची बॅग हिसकावून घेऊन गेले. पोलिसांनी या दाव्यांच्या आधारे आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु कोणत्याही संशयास्पद वाहनाचा किंवा हालचालीचा पुरावा मिळाला नाही. जेव्हा पोलिसांनी कारचा रंग, मॉडेल, रस्ता आणि घटनास्थळाबाबत सविस्तर विचारणा केली, तेव्हा विद्यार्थिनीच्या उत्तरांमध्ये विसंगती दिसून आली.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर विद्यार्थिनीने कबूल केलं की, कोणीही तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. हे संपूर्ण प्रकरण तिने स्वतः रचलं होतं. तिला ग्रामीण भागातील कॉलेज सोडून मंगळुरू शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता, परंतु घरचे लोक त्यासाठी तयार नव्हते. याच कारणामुळे तिने ही गोष्ट रचली, जेणेकरून घाबरून कुटुंबियांनी तिला दुसऱ्या कॉलेजमध्ये पाठवावं.

तपासात असंही समोर आलं की, विद्यार्थिनीने स्वतःची पुस्तकं घराशेजारीच जाळली होती, पण पोलिसांना सांगितलं की अपहरणकर्त्यांनी ती नेऊन जाळली. अशा प्रकारे तिने आपला दावा 'खरा' दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आता या प्रकरणाकडे चुकीची माहिती देणं आणि खोटा गुन्हा दाखल करणं या अँगलने पाहत आहेत. विद्यार्थिनी अल्पवयीन आहे, त्यामुळे पुढील कारवाईत समुपदेशन आणि पालकांची भूमिका महत्त्वाची असेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking! Girl fakes abduction to study in city college.

Web Summary : A Karnataka girl fabricated her abduction story to study in Mangaluru. She falsely claimed attackers burned her books. Police investigation revealed her deception, aiming to manipulate her family to allow her city college admission.
टॅग्स :Karnatakकर्नाटकSchoolशाळाStudentविद्यार्थीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी