शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गॅंगरेप पीडितेवर पोलीस ठाण्यातही पोलिसाकडून बलात्कार; यूपीतील संतापजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 17:47 IST

Sexual Abuse Case : आरोपी अधिकारी असलेल्या स्टेशन हाऊस ऑफिसर टिळकधारी सरोज याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील एका १३ वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलीस ठाण्याच्या प्रभारीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे, ज्यावेळी पीडिता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती. पीडित तरुणीने आरोप केला आहे की, तिच्यावर चार जणांनी बलात्कार केला होता, त्यानंतर ती एका नातेवाईकासह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. आरोपी अधिकारी असलेल्या स्टेशन हाऊस ऑफिसर टिळकधारी सरोज याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार असून तीन पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत, असे ललितपूरमधील एका वरिष्ठ पोलीस  अधिकाऱ्याने सांगितले. अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या सर्व पोलिसांना कर्तव्यावरून हटवण्यात आले आहे. डीआयजी दर्जाचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करेल आणि २४ तासांत अहवाल सादर करणार आहे .

जामा मशिदीजवळ शस्त्रासह संशयिताला अटक, पोलिसांनी सुरु केला तपास

याप्रकरणी  सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून तो फरार आहे. गेल्या २२ एप्रिलला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडिता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पोहोचली. मात्र, तिथे तिला न्याय मिळण्याऐवजी पुन्हा यातनांचा मिळाल्या. तिच्यावर पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केला, असा आरोप १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने केला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशपोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी पोलीस अधिकारी आणि इतर आरोपींना अटक करण्यासाठी ३ पोलीस पथके तयार करण्यात आली आहे. पीडितेने या घटनेची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अद्याप अटक झालेली नाही. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटक