जामा मशिदीजवळ शस्त्रासह संशयिताला अटक, पोलिसांनी सुरु केला तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 05:08 PM2022-05-04T17:08:17+5:302022-05-04T17:12:45+5:30

Suspect person arrested : चौकशीत हा दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Suspect person arrested with weapon near jama mosque in noida police engaged in investigation | जामा मशिदीजवळ शस्त्रासह संशयिताला अटक, पोलिसांनी सुरु केला तपास

जामा मशिदीजवळ शस्त्रासह संशयिताला अटक, पोलिसांनी सुरु केला तपास

Next

नोएडा : गौतम बुद्ध नगरमधील नोएडा पोलीस स्टेशन फेज-वनने बुधवारी दुपारी जामा मशिदीजवळून एका व्यक्तीला अवैध शस्त्रांसह अटक केली. लुटण्याच्या प्रयत्नात तो हिंडत होता. पोलीस स्टेशन फेज-वनच्या पोलीस अधिकारी वीरेश पाल गिरी यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी पोलिसांनी इरफानला जामा मशिदीजवळूनअटक केली. इरफान हा बुढाना जिल्हा मुझफ्फरनगर येथे राहणारा असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे पोलिसांनी जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीत हा दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


नोएडामध्ये सध्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात नोएडा भागातील बीटा-2 पोलीस स्टेशन आणि दरोडेखोर यांच्यात शुक्रवारी रात्री उशिरा चकमक झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी झाडलेली गोळी एका गुन्हेगाराच्या पायाला लागली असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली होती. त्याच्याकडून 2 मोबाईल फोन, देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे, नंबर प्लेट नसलेली कार जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने सांगितले की, त्याच्या तीन साथीदारांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाईल न मिळाल्याने नवविवाहितेने जीव दिल्याने खळबळ 


    जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यास सुरुवात केली
    अतिरिक्त पोलीस उपायुक्त (झोन III) विशाल पांडे यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस ठाणे बीटा-2 चे चेकिंग करत होते. त्यानंतर पी-3 सेक्टरजवळ नंबर प्लेट नसलेली कार दिसली. संशयावरून पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना पाहून कारचालक पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी नाकाबंदी करून कार थांबवली, तेव्हा कारमधील बदमाशाने स्वत:ला वेढलेले पाहून जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांवर गोळीबार सुरू केला.

    Web Title: Suspect person arrested with weapon near jama mosque in noida police engaged in investigation

    Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.