सोनसाखळी चोराशी झालेली झटापट जीवावर बेतली; वृद्ध महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 23:22 IST2022-04-05T23:22:17+5:302022-04-05T23:22:40+5:30

सोनसाखळी चोराशी झालेली झटापट एका वृद्ध महिलेच्या जीवावरच बेतल्याची घटना घडली आहे.

The fight with the gold chain thief Elderly women die palghar crime news | सोनसाखळी चोराशी झालेली झटापट जीवावर बेतली; वृद्ध महिलेचा मृत्यू

सोनसाखळी चोराशी झालेली झटापट जीवावर बेतली; वृद्ध महिलेचा मृत्यू

पालघर - सोनसाखळी चोराशी झालेली झटापट एका वृद्ध महिलेच्या जीवावरच बेतल्याची घटना घडली आहे. पुष्पा पांडुरंग मेहेर (वय ७६ वर्ष) या मुरबे जेट्टी वरून सातपाटीला आपल्या घराकडे परतत होत्या. त्याच वेळी एका चोरानं त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सातपाटी येथे राहणाऱ्या ७६ वर्षीय वृद्ध महिला सातपाटी-मुरबे खाडीतून होडीद्वारे प्रवास करून मुरबे येथील जेट्टी वरून जात होत्या. तेव्हा एका अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन साखळी खेचण्याच्या प्रयत्नात त्या वृद्ध महिलेची अज्ञात चोराशी झटापट झाली. या झटापटीत त्या खाली पडल्या नंतर त्याच्या डोक्याला जोरदार मार बसला व त्या गंभीर जखमी झाल्या. 

मात्र ही माहिती नातेवाईकांना कळाल्या नंतर त्यांनी उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान खूप वेळ निघून गेल्याने खूप रक्तस्त्राव झाल्याने त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: The fight with the gold chain thief Elderly women die palghar crime news