आई वडिलांना लिहिली अखेरची चिठ्ठी, जगाचा घेतला निरोप; महिला शिक्षिकेनं का उचललं धक्कादायक पाऊल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:14 IST2026-01-27T16:13:33+5:302026-01-27T16:14:49+5:30

स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर कटहरा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी हाजीपूर इथल्या जिल्हा रुग्णालयात पाठवले

The death of teacher Priya Bharti in Vaishali, Bihar, has caused a stir in the area, police investigation on | आई वडिलांना लिहिली अखेरची चिठ्ठी, जगाचा घेतला निरोप; महिला शिक्षिकेनं का उचललं धक्कादायक पाऊल?

आई वडिलांना लिहिली अखेरची चिठ्ठी, जगाचा घेतला निरोप; महिला शिक्षिकेनं का उचललं धक्कादायक पाऊल?

वैशाली- बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सेहान गावातील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवला. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

माहितीनुसार, महिला शिक्षिका शाळेपासून काहीच अंतरावर भाड्याने खोली घेऊन राहत होती. या शिक्षिकेचे शाळेतील इतर शिक्षकांसोबत वाद झाल्याचं कळते परंतु पोलीस सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहेत. मृत महिला रसूलपूर गावातील रहिवासी दीपक राज यांची पत्नी प्रिया भारती या आहेत. प्रिया यांना ३ महिन्याची एक मुलगीही आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली. ज्यात शिक्षिकेने लिहिलंय की, सॉरी आई बाबा, माझ्याशी कुणाचा वाद झाला नाही. मी स्वेच्छेने या जगाचा निरोप घेत आहे. माझे शरीर रसलपूरला घेऊन जाऊ नका. माझे अंत्यसंस्कार हाजीपूर येथे करावे. मुखाग्नी माझ्या पतीऐवजी मुलीकडून द्यावेत. माझा मोबाईल पतीकडे सोपवावा. माझ्या मोबाईलमध्ये काही मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत, त्याचा पासवर्ड पतीला माहिती आहे. मी कुणाचं मन दुखावले असेल तर माफी असावी. माझे पोस्टमोर्टम करू नका. माझे पती अथवा कुटुंब कुणावरही खटला दाखल करू नका. हे माझे वैयक्तिक पाऊल आहे. साडे ५ लीटर दूधाचे बिल थकले आहे. माझ्या पाकिटात पैसे आहेत त्यातून ते बिल भरावे असं तिने सांगितले. 

तर स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर कटहरा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी हाजीपूर इथल्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. सकाळी एकाने फोन करून महिलेने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा या महिलेची ओळख पटली. या मृत महिलेचे नाव प्रिया भारती असं असून ती शिक्षिका होती. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट आढळली. सध्या पोलीस हे पत्र ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे असं महुआ येथील एसडीपीओ संजीव कुमार यांनी सांगितले. 

Web Title : शिक्षिका की आत्महत्या: माता-पिता को अंतिम पत्र, एक दुखद विदाई।

Web Summary : बिहार के वैशाली में एक शिक्षिका ने आत्महत्या कर ली। एक सुसाइड नोट में पता चला कि उसने यह कदम स्वेच्छा से उठाया, अंतिम संस्कार की विशिष्ट व्यवस्थाओं का अनुरोध किया और अपने परिवार के लिए निर्देश छोड़े। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Teacher's suicide: Last letter to parents, a tragic farewell.

Web Summary : A teacher in Vaishali, Bihar, tragically ended her life. A suicide note revealed she took this step willingly, requesting specific funeral arrangements and leaving instructions for her family. Police are investigating the case.