शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

टायर पंक्चर करुन दाम्पत्यास लुटले, लुटारूंना आखला असा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:49 IST

Robbery Case : हिरडी शिवारातील घटना, ६४,५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावला

समुद्रपूर ( वर्धा) : नागपूर जिल्ह्यातील वणी येथे कारने जात असताना रस्त्यावर काहीतरी टाकून कारचे टायर पंक्चर करुन अज्ञात चार लुटारुंनी चालकाला मारहाण करीत तसेच कारमधील दाम्पत्यास मारहाण करीत त्यांच्याजवळून दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ६४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेला. ही घटना महामार्ग पोलीस चौकीच्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरडी शिवारात ७ रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली.आकिब खान उस्मान खान पठाण रा. वणी हा एम.एच. २९ एडी. ५७०८ क्रमांकाच्या कारमध्ये दाम्पत्याला बसवून वणी येथे गावी जात असताना मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अचानक कारचा समोरील टायर पंक्चर झाला. चालकाने रस्त्याकडेला कार थांबवून कारखाली उतरुन पाहणी करीत असतानाच कारजवळ चार अज्ञात व्यक्ती आल्या आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून रोख १६ हजार ५०० रुपये व त्यांच्या पत्नीच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने, कानातील कर्णफुले, १२ ग्रॅमचे मंगळसूत्र असा एकूण ६४,५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेत पळ काढला.

यापूर्वी ३ वेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या असल्याने याची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी अरविंद येणोरकर व त्यांच्या टीमसह पथक रवाना केले. बोरखेडी टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून शोध कार्य सुरु केले आहे. पंकज मसराम यांनी श्वान पथक बोलावून ठसे तज्ज्ञांना पाचरण करुन चौकशीला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता समुद्रपूर पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांनी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासासाठी मार्गदर्शन केले. पुढील तपास प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज मेश्राम, सूर्यवंशी, जितेंद्र वैद्य, राजू शेंडे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरी