बेपत्ता तरुणीचा मृतदेह झाडाला लटकलेला, आत्महत्या की हत्या, याची चाैकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 16:23 IST2023-05-16T16:22:54+5:302023-05-16T16:23:19+5:30
वाडा-कुडूस : तालुक्यातील कापरी येथील ९ मेपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह सोमवारी जंगलात एका झाडाला लटकत असल्याचे उघडकीस आले ...

बेपत्ता तरुणीचा मृतदेह झाडाला लटकलेला, आत्महत्या की हत्या, याची चाैकशी सुरू
वाडा-कुडूस : तालुक्यातील कापरी येथील ९ मेपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह सोमवारी जंगलात एका झाडाला लटकत असल्याचे उघडकीस आले आहे. या तरुणीच्या डोक्यावरील केस काढल्याचे निदर्शनास आले असून या मुलीसोबत गैरप्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
या घटनेने खळबळ उडाली असून तिने आत्महत्या केली की, तिची हत्या झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
दर्शना विलास धोडी (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे. तालुक्यातील कापरी येथील रहिवासी असलेली दर्शना धोडी ही येथीलच एका फार्महाऊसवर कामाला होती. ती ९ तारखेपासून कामावरून घरी परतलीच नाही. कुटुंबाने तिची शोधाशोध केली असता ती सापडली नव्हती. सोमवारी येथील जंगलात तिचा मृतदेह एका झाडाला लटकत असताना दिसला. तिचा मृतदेह वाडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेची सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणण्याची मागणी आदिवासी समाजाचे नेते अनंता वनगा यांनी केली आहे.