सेवानिवृत्त पोलिसाचा मृतदेह नाल्यात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 07:43 IST2022-06-20T07:42:50+5:302022-06-20T07:43:27+5:30

Mumbai: मुंबई पोलीस दलातील बेपत्ता निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह रविवारी नाल्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. शिवदास भोजराज कुमावत (वय ८७)  असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

The body of a retired policeman was found in Nala | सेवानिवृत्त पोलिसाचा मृतदेह नाल्यात सापडला

सेवानिवृत्त पोलिसाचा मृतदेह नाल्यात सापडला

मुंबई : मुंबई पोलीस दलातील बेपत्ता निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह रविवारी नाल्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. शिवदास भोजराज कुमावत (वय ८७)  असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 
मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीतील साईराम सोसायटीत कुमावत कुटुंबीयांसोबत राहायचे. त्यांचा मुलगाही पोलीस दलात आहे. कुमावत पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची उकल केली आहे. १५ जून रोजी संध्याकाळ झाली. मात्र, तरीही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरवल्याप्रकरणी नोंद करत तपास सुरू केला. कुमावत यांचा शोध सुरू असताना रविवारी म्हाडा कॉलनी येथील नाल्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. 

सीसीटीव्ही तपासले
पोलिसांसह कुटुंबीयांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, १५ तारखेला रात्री कुमावत महालक्ष्मी सोसायटीच्या दिशेने मागे जाताना दिसून आले. त्यांना स्मृतिभंशचा आजार असल्याने ते वाट चुकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नाल्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. 

Web Title: The body of a retired policeman was found in Nala