भरधाव टेम्पोने दुचाकीला उडविले; चार जण जागीच ठार

By राजकुमार जोंधळे | Updated: March 4, 2023 05:21 IST2023-03-04T05:20:35+5:302023-03-04T05:21:20+5:30

जोडजवळा परिसरात रात्री घडली घटना

The bike and fast tempo; Four people died on the spot latur kalamb accident | भरधाव टेम्पोने दुचाकीला उडविले; चार जण जागीच ठार

भरधाव टेम्पोने दुचाकीला उडविले; चार जण जागीच ठार

लातूर : कळंबकडून लातूरच्या दिशेने शिमला मिरची घेऊन निघालेल्या भरधाव पिकअप टॅम्पोने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना लातूर तालुक्यातील जोडजवळा परिसरात शुक्रवारी रात्री घडली.

पोलिसांनी सांगितले, लातूरकडून कळंबच्या दिशेने दुचाकीवर चारजण शुक्रवारी रात्री जात होते. दरम्यान, कळंबकडून शिमला मिरची घेऊन लातूरच्या दिशेने पिकअप टेम्पो भरधाव येत होता. जाेडजवळा गावानजीक आल्यानंतर एका धाब्यानजीक भरधाव पिकअप टेम्पोने दुचाकीला जोराने उडविले. या भीषण अपघातात दुचाकीवरील चारजण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी गातेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक खोत यांच्यासह पोलिसांनी भेट दिली. अपघातातील मयत चौघांना लातूरच्या शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. रात्री उशीरापर्यंत दुचाकीवरील मयत चार जणांची नावे हाती आली नाहीत. टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये दुचाकीवरील चारही जण रस्त्यालगत फेकले गेले. यामध्येच ते ठार झाल्याची माहिती गातेगाव ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक किशोर कांबळे यांनी दिली.

रात्रीच्या काळोखात घडला भीषण अपघात...

रात्रीची वेळ आणि सर्वत्र काळोख पसरला होता. दरम्यान, लातूरकडून निधालेल्या दुचाकीला कळंब कडून येणाऱ्या भरधाव टेम्पोने जोराने उडविले. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील चारजण ठार झाल्याची माहिती गातेगाव पोलिसांनी दिली.

Web Title: The bike and fast tempo; Four people died on the spot latur kalamb accident

टॅग्स :Accidentअपघात