हैवान बापाने दोन निष्पाप मुलींच्या गुप्तांगात टाकली धारदार वस्तू, प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 20:23 IST2022-02-27T20:23:33+5:302022-02-27T20:23:53+5:30
Crime News : प्रथमदर्शनी ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास सिव्हिल लाईन पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हैवान बापाने दोन निष्पाप मुलींच्या गुप्तांगात टाकली धारदार वस्तू, प्रकृती चिंताजनक
जिंद - क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडत, हरियाणाच्या जिंद जिल्ह्यात एका हैवान पित्याने आपल्या दोन निष्पाप मुलींच्या गुप्तांगात धारदार वस्तू घुसवली, त्यानंतर दोन्ही मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, मुलींच्या आईने तिच्या पतीवर मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मात्र, प्रथमदर्शनी ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास सिव्हिल लाईन पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस पुढे म्हणाले की, एक महिला तिच्या तीन वर्षांच्या आणि दोन वर्षांच्या मुलींसह बसस्थानकाजवळील पोलीस चेक पोस्टवर आली आणि तिच्या वडिलांनी केलेल्या क्रूरतेबद्दल तेथे उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले. तिनेसांगितले की, दोन्ही मुलींच्या गुप्तांगात धारदार वस्तू टाकण्यात आली होती, त्यामुळे जखमा झाल्या आणि मुलींना वेदना होत होत्या. माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून महिला व दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केले. ही महिला मूळची मध्य प्रदेशची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेचे म्हणणे आहे की, तिचे लग्न जिंद येथील रहिवासी धरमपाल याच्याशी झाले होते आणि त्याने तिच्या दोन्ही निष्पाप मुलींसोबत हे क्रूर कृत्य केले आहे. महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीनेही तिला मारहाण केली. दोन्ही मुलींसह सासरच्या घरातून बाहेर काढल्याचे तिने सांगितले. सध्या दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.