पुन्हा धाडसत्र सुरू; सोलापुरातून पीएफआयच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 11:27 IST2022-09-27T11:26:25+5:302022-09-27T11:27:44+5:30
देशातील सहा राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अड्ड्यावर छापे टाकण्यात आले

पुन्हा धाडसत्र सुरू; सोलापुरातून पीएफआयच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात
रुपेश हेळवे
सोलापूर : देशभरात पुन्हा एकदा पीएफआयच्या कार्यकर्त्यांविरुद्ध धाडसत्र मोहिम हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून हस्तकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंब्रा, मालेगाव आणि सोलापुरातूनही काहींना अटक झाली आहे. सोलापुरात एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका कार्यकर्त्याला मंगळवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी शहरातील एका पोलिस ठाण्यामध्ये ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशातील सहा राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अड्ड्यावर छापे टाकण्यात आले असून, या छाप्यात एनआयए आणि ईडीने पॉप्युलर फ्रंटच्या १०६ हून अधिक नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर, आज पुन्हा एकदा देशभरात छापेमारी करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर सोलापुरातील छापेमारी करत एका कार्यकर्त्याला मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.