शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

ठाण्यातील कॉल सेंटर प्रकरण : व्यवस्थापकाची होती २० टक्क्यांची भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 6:04 AM

अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या ठाण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणात मंगळवारी आणखी एका व्यवस्थापकाला अटक झाली.

ठाणे : अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या ठाण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणात मंगळवारी आणखी एका व्यवस्थापकाला अटक झाली. त्याची या कंपनीत २० टक्क्यांची भागीदारी होती. यातून आरोपींनी कशी माया जमवली, याची तपशीलवार माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.कर चुकवणाºया अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून खंडणी उकळणाºया ठाण्यातील बोगस कॉल सेंटर्सचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने आॅक्टोबर २०१६ मध्ये केला होता. मंगळवारी याप्रकरणी तपेश गुप्ताला पोलिसांनी अटक केली. यातील सूत्रधार शॅगी, तपेश गुप्ता आणि अविनाश मास्टर हे वर्गमित्र होते. तपेशने एका बीपीओ कंपनीत नोकरी केली. त्यावेळी फेसबुकद्वारे शॅगी पुन्हा तपेशच्या संपर्कात आला. शॅगीने त्याच्या कॉल सेंटरमध्ये नोकरीचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी या कॉल सेंटरमधे काय चालते याची माहिती नव्हती असे तपेशने सांगितले.तपेशने तेथे नोकरी पत्करली, त्यावेळी आसनक्षमता केवळ २० होती. काही दिवसांतच शॅगीने कॉल सेंटरचा विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली. पाहतापाहता इमारतीमधील सात मजल्यांमध्ये बोगस कॉल सेंटरचा कारभार विस्तारला. आॅपरेटर्सची संख्या २० वरून २०० पर्यंत पोहोचली. तसेच नफ्यातही वाढ झाली. कॉल सेंटर चालवणाºया प्रमुख आरोपींमध्ये सहभाग असलेला तपेश गुप्ता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे.संपत्तीचे प्रदर्शन शॅगीच्या अंगाशीशॅगीला कॉल सेंटरमधून अल्पावधीत मोठी माया मिळाली. संपत्तीचे प्रदर्शन करणे त्याला आवडायचे. यातूनच त्याच्याबद्दल कुजबूज सुरू झाली आणि हा विषय पोलिसांपर्यंत पोहोचला, असे तपेश गुप्ताचे म्हणणे आहे.अंगडियाने यायचा पैसा : अमेरिकन नागरिकांना आयट्यून अथवा अन्य गिफ्टकार्ड घेण्यास बाध्य करून कार्डवरील सांकेतिक क्रमांक आरोपी घ्यायचे. त्याआधारे गिफ्टकार्डची रक्कम आरोपी वठवायचे. याशिवाय, शॅगीची देशविदेशांतील बँकांमधील खात्यांची माहितीही पोलिसांना मिळाली होती. तपेशने या आर्थिक साखळीमधील वेगळी माहिती पोलिसांना दिली. गुन्ह्यातील रोकड बºयाचदा अंगडियाद्वारेही आली असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे