तीन लाखांच्या एमडी पावडरसह ठाण्यात नायजेरियन गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 00:43 IST2019-06-27T00:43:16+5:302019-06-27T00:43:29+5:30

मुंब्र्यात एमडी पावडर विक्रीसाठी आलेल्या नवीमुंबईतील अँणी चिमेझी बेन्जीमन (31) याला बुधवारी सायंकाळी अटक केली.

Thane Nigerian GazaAd with Thirty Lakh MD Powder | तीन लाखांच्या एमडी पावडरसह ठाण्यात नायजेरियन गजाआड

तीन लाखांच्या एमडी पावडरसह ठाण्यात नायजेरियन गजाआड

ठाणे - मुंब्र्यात एमडी पावडर विक्रीसाठी आलेल्या नवीमुंबईतील अँणी चिमेझी बेन्जीमन (31) याला बुधवारी सायंकाळी अटक केली.त्याच्याकडून तीन लाखांची एमडी पावडर जप्त केली आहे. मुंब्रा बायपास रोड येथे एक नायजेरियन व्यक्ती एमडी पावडर या अंमली पदार्थाची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरिक्षक संजय गळवे यांना मिळाली होती,त्यानुसार सापळा रचुन त्याला ताब्यात घेत अंग झडतीत त्याच्याकडून 132 ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त केली, त्याची किंमत 2 लाख 90 हजार इतकी असून त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम 8 (क) 22(ब),29 अन्वेय गुन्हा दाखल करत अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी दिली.

Web Title: Thane Nigerian GazaAd with Thirty Lakh MD Powder