मामाभाचीवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:49 IST2019-02-07T05:49:06+5:302019-02-07T05:49:19+5:30

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह तिच्या मामावर ऊस तोडण्याच्या शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड येथे घडली.

thane crime News | मामाभाचीवर जीवघेणा हल्ला

मामाभाचीवर जीवघेणा हल्ला

ठाणे - कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह तिच्या मामावर ऊस तोडण्याच्या शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड येथे घडली. दुंडाप्पा कट्टीमणी (६०) आणि शोभा हरिजन (४०) हे जखमी झाले. त्यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर अशोक हरिजन (४५) घटनेनंतर पळून गेला. ब्रह्मांड येथील एका बांधकाम साइटवर दुंडाप्पा हे मजुरीचे काम करतात. शोभा ही त्यांची भाची आहे. तिचा नवरा अशोक दारू पिऊन मारहाण करत असल्याने शोभा मुलांसह मामाकडे राहायला आली. तिला घरी घेऊ न जाण्यासाठी मंगळवारी अशोक आला होता. शोभा त्याच्यासोबत जाण्यास तयार नसल्याने दुंडाप्पांनी त्याला विरोध केला. त्याचा राग येऊन अशोकने मारहाण केली. अशोक विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: thane crime News