Thane Accident: ठाण्यात होंडा सिटी कारची दोन रिक्षा, एका कारला धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 05:58 IST2023-03-02T05:58:42+5:302023-03-02T05:58:56+5:30
रिक्षा आणि कार या विवियाना मॉल समोर रस्त्याशेजारी उभ्या होत्या. यावेळी वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना मागून धडक दिली.

Thane Accident: ठाण्यात होंडा सिटी कारची दोन रिक्षा, एका कारला धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू
ठाण्यामध्ये बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर होंडा सिटी कारने दोन रिक्षा, एका कारला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. चालक अपघातानंतर कार तिथेच टाकून पळून गेला आहे.
रिक्षा आणि कार या विवियाना मॉल समोर रस्त्याशेजारी उभ्या होत्या. यावेळी वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना मागून धडक दिली. घटनास्थळी राबोडी पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी दाखल झाले. तत्पूर्वीच स्थानिक लोकांनी अपघात ग्रस्त व्यक्तींना उपचारासाठी जुपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे दाखल केले होते.
मृताचे नाव अभिमन्यू अर्जुन प्रजापती असे आहे. तर जखमीचे नाव वकील अहमद अन्सारी असे आहे अन्सारींच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे. होंडा सिटी कारचा मालक मोहमद अहमद असून या कारचा चालक अज्ञात आहे, पोलिस अधिक तपास करत आहेत.