पुणे : दहशतवादी संघटनांकडून देशाच्या दक्षिण तसेच भारत व पाकिस्तान सीमेच्या सर क्रीक भागात हल्ला होण्याची शक्यता आहे. गुप्तवार्ता विभागाकडून याबाबतची अधिक तपशील मिळाले असून त्याठिकाणी काही बोटी सापडल्या आहेत. यामुळे पुढील काळात दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन लष्करातर्फे उपाय योजना आखण्यात येत असल्याची माहिती लष्काराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. के सैनी यांनी सोमवारी दिली.राधा कालिदास दरयानानी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आर्मी लॉ विद्यालयासाठी सहा एकर जमीन दिली आहे. विद्यालयाच्या दुसऱ्या फेजचे उद्घाटन सैनी यांच्या हस्ते झाले. यावेळी सैनी म्हणाले, सर क्रिक भागातील दहशतवादी हल्लाचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्याभागातील लष्करी क्षमता वाढविण्यात आली आहे. दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कर पूर्ण सक्षम आहे. दहशतवादी संघटनांनी हल्लाचे लक्ष ठेवले असले तरीही आम्ही त्यांचा यशस्वी प्रतिकार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्यामुळे सर क्रिक भागा विषयी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. तसेच क्रिक हा भाग भारत-पाकिस्तान सीमेलगत ९६ किलोमीटरचा खाडीचा भाग असून सीमेबाबत दोन्ही देशामध्ये वाद आहे. काश्मिर मधील संघषार्ला काही अंतर्गत बाबी बरोबरच बाह्य शक्ती कारणीभूत आहे. काश्मिरबाबत भारताचे धोरण स्पष्ट असून याभागात होणाºया संघषार्ला तोंड देण्याची तयारी केंद्र सरकारची आहे. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर पूर्णपणे तयार आहे. यापरिसरातील असणारे धोक्यांना तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहेत. यामुळे आमच्या कार्यशैलित बदल होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गुजरातच्या सर क्रीक भागात दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याची शक्यता : लेफ्टनंट जनरल ए. के. सैनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 20:55 IST
दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कर पूर्ण सक्षम आहे...
गुजरातच्या सर क्रीक भागात दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याची शक्यता : लेफ्टनंट जनरल ए. के. सैनी
ठळक मुद्देलष्कर विधी महाविद्यालयाकरिता सहा एकर जागा