Terrorist attack on BJP leader in jammu kashmir; Shot dead, two injured | भाजपा युवा मोर्चाच्या महासचिवावर दहशतवादी हल्ला; गोळी झाडून हत्या, दोघे जखमी

भाजपा युवा मोर्चाच्या महासचिवावर दहशतवादी हल्ला; गोळी झाडून हत्या, दोघे जखमी

श्रीनगर : जम्मू काश्मीरला 370 कलमातून मुक्त केल्यानंतर भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आले आहेत. भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असून आजही कुलगाममध्ये एका नेत्यावर हल्ला झाला. यामध्ये गोळी लागल्याने नेत्याचा मृत्यू झाला असून दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. 


गंभीर जखमी कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. पोलीस व सैन्याने घटनास्थळाचा भाग घेरला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे. भाजपा युवा मोर्चाचे महासचिव फिदा हुसेन हे दोन सहकाऱ्यांसोबत घराच्या दिशेने जात होते. वाटेत दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यानंतर दहशतवादी तेथून फरार झाले. घटनास्थळी पोहोचलेस्या पोलिसांनी भाजपा नेत्यासह साथीदारांना हॉस्पटलमध्ये नेले. मात्र, उपचारावेळी फिदा हुसेन यांचा मृत्यू झाला.जखमी सहकाऱ्याची ओळख पटली असून त्याचे नाव उमर हजाम आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलीस आणि सैन्यदल एकेका घराची तपासणी करत आहेत. हे दहशतवादी एक वाहनातून आले होते. हल्ला केल्यानंतर तेथून त्या वाहनाने पसार झाले. याआधीही भाजपाच्या नेत्यांवर दहशतवादी हल्ले झाले आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. य़ामुळे घाबरून अनेकांनी राजीनामा दिला आहे. 

Web Title: Terrorist attack on BJP leader in jammu kashmir; Shot dead, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.