Zomato Dog Bite: भयानक Video ! श्वानाने झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा प्रायव्हेट पार्ट चावला; पनवेलमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 16:48 IST2022-09-09T16:43:13+5:302022-09-09T16:48:37+5:30
झोमॅटो डिलिव्हरी बॉयसोबत धक्कादायक प्रकार. श्वानाने प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला.

Zomato Dog Bite: भयानक Video ! श्वानाने झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा प्रायव्हेट पार्ट चावला; पनवेलमधील घटना
पनवेल : पनवेलमधील इंडियाबुल्सच्या हायफाय सोसायटीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा प्रायव्हेट पार्ट पाळीव कुत्र्याने चावल्याचा भयानक व्हिडीओ समोर आला आहे. हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा त्या कुत्र्याचा मालक हातात साखळी घेऊन होता.
झोमॅटो किंवा अन्य कोणत्याही कंपनीचे डिलिव्हरी बॉय हे जोखमीचे काम करत असतात. त्यांना अपघात किंवा अन्य दुर्घटनांना सामोरे जावे लागते. पनवेलमध्ये भयानक प्रकार घडला आहे. डिलिव्हरी देऊन डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर पडत असताना कुत्र्याचा मालक लिफ्टमध्ये येत होता. हा कुत्रा जर्मन शेफर्ड जातीचा होता. डिलिव्हरी बॉय बाहेर पडत असताना मालकाने कुत्र्याला मागे ओढले. कुत्रा आत येत असल्याचे पाहून तो मागेही झाला. डिलिव्हरी बॉय बाहेर जाऊ लागला, याचवेळी कुत्र्याने उडी घेत तरुणाचा प्रायव्हेट पार्टला चावा घेतला.
या हल्ल्यामुळे डिलिव्हरी बॉय रक्तबंबाळ झाला, वेदनेने विव्हळत होता. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने त्याला डीवाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याला अँटी रेबीज इंजेक्शन देण्यात आले आहे. तसेच प्रायव्हेट पार्टवर जिथे जखमा झाल्या आहेत, त्याला टाके घालण्यात आले आहेत.
ये अत्याचार कब बंद होगा ?
— Nigar Parveen (@NigarNawab) September 9, 2022
मुंबई के पनवेल का वीडियो देखिए, जोमेटो डिलीवरी बॉय पर लिफ्ट में जर्मन सैफर्ड ने प्राइवेट पार्ट हमला कर दिया। डिलीवरी बॉय तड़पता रहा pic.twitter.com/2bb87j0IRy
छोट्या बहीणीचा वाढदिवस होता...
या झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयच्या छोट्या बहीणीचा त्याच दिवशी वाढदिवस होता. यामुळे त्याला सुटी घेण्यास सांगितले गोते. मात्र, विकेंडला जादा काम मिळते म्हणून तो कामाला गेला होता. त्या दिवसाची ती पहिलीच डिलिव्हरी होती, असे या तरुणाने सांगितले.