शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

श्रद्धाएवढेच भयानक! एअरहॉस्टेसने नकार दिला, तरुणाने फुटक्या बॉटलने तिच्या चेहऱ्यावर वार केले, २५ टाके पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 14:33 IST

तरुणाने तो नौदलाचा अधिकारी असल्याचे सांगून फेसबुकवर तिच्याशी मैत्री केली होती. परंतू तो, आयएनएस अडयार कँटीनमध्ये दिवसाच्या पगारावर काम करणारा कामगार होता. 

दिल्लीनंतर चेन्नईमध्ये भयंकर प्रकार घडला आहे. तरुणीने प्रेमसंबंधांसाठी नकार दिला तर तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्य़ाचे प्रकार घडले आहेत. काही दिवसांपूर्वी तर दिल्लीत श्रद्धाचे ३५ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता चेन्नईत एअरहॉस्टेससोबत भयानक प्रकार घडला आहे. 

एका तरुणाने 20 वर्षीय एस्पॉयरिंग एयरलाइन केबिन क्रू एअरहॉस्टेसला प्रेमासाठी मागणी घातली होती. तिने त्यास नकार दिला होता. या तरुणाने तो नौदलाचा अधिकारी असल्याचे सांगून फेसबुकवर तिच्याशी मैत्री केली होती. परंतू तो, आयएनएस अडयार कँटीनमध्ये दिवसाच्या पगारावर काम करणारा कामगार होता. 

तरुणीने त्याला नकार देताच आरोपी नवीन कुमारने त्याच्या जॅकेटमध्ये लपविलेली रिकामी बिअरची बॉटल बाहेर काढली. ती तोडली आणि त्या तरुणीच्या चेहऱ्यावर वार केले. यामुळे या तरुणीच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून तिच्या चेहऱ्यावर २५ टाके पडले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. पोलिसांनी सांगितले की, नवीनने तरुणीच्या चेहऱ्यावर मुद्दाम वार केले आहेत. तिला एअरलाईनमध्ये नोकरी मिळू नये व कोणाशी लग्न होऊ नये म्हणून तिचा चेहरा विकृत करायचा होता. तिचे दुसऱीकडे कुठेतरी अफेअर असू शकते, असाही संशय आरोपीला होता. ही तरुणी केरळच्या थिरुवनंतपुरमची होती. सहा महिन्यांपूर्वीच या तरुणाने फेसबुकवर तिच्याशी मैत्री केली होती. 

मंगळवारी रात्री ही तरुणी हॉटेलवरून तिच्या हॉस्टेलला जात होती. तेव्हा नवीनने तिला रोखले. तिच्याशी लग्न करायचे आहे, असे तो म्हणत होता. तिने नकार देताच त्याने रागात जॅकेटमध्ये लपविलेली बॉटल काढली आणि तिच्या चेहऱ्यावर सलग वार केले. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतू तो पळून जाण्यास यशस्वी ठरला होता, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी