भीषण उपघात! ट्रेलरमधील भली माेठी रिम कारवर काेसळली; चालकाचा चिरडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 18:04 IST2021-09-27T18:03:47+5:302021-09-27T18:04:20+5:30
Accident Case :हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. सदर चालक नवीमुंबई मधील पेशाने डॉक्टर असल्याचे समजते.

भीषण उपघात! ट्रेलरमधील भली माेठी रिम कारवर काेसळली; चालकाचा चिरडून मृत्यू
अंकुश माेरे
वावाेशी - मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेलरवरील कागदाची भली माेठी रिम कार वर पडली. त्यामध्ये कार अक्षरशः चपटी झाली. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. कारच्या छताचा पत्रा ताेडून कार चालाचा मृतदेह बाहेर काढावा लागला. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. सदर चालक नवीमुंबई मधील पेशाने डॉक्टर असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेदहा च्या सुमारास नवीमुंबई येथील डॉक्टर आदित्य तंखीवले हे हुंडाई आयटेन या त्यांच्या कारने एक्स्प्रेस हायवे वरुन पुण्याहून मुंबईकडे येत हाेते. त्यांच्या समोरुन कागादाची भली माेठी रिम घेऊन ट्रेलर जात हाेता. ट्रेलर एका वळणावर कलांडला व पलटी झाला त्या ट्रेलर मध्ये कागदाचे भले मोठे रिम होते. ते रिम त्या ट्रेलर मधून निसटले. त्यातील काही रिम मागून येत असलेल्या आदित्य तंखीवले यांच्या कार वर कोसळले. रिमचे वजन खूप असल्याने काही कळायच्या आत आदित्य यांची कार त्या रिमखाली दबली गेली. रिम पडल्याने कार अक्षरशः चपटी झाली आणि त्यात आदित्यही दाबले गेले. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तानच्या मदतीला या संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहचले पण खूप वेळ गेला होता. कारमध्ये आदित्य अडकून पडले होते.सर्व बचाव यंत्रणेने कारच्या छताचा पत्रा ताेडून आदित्य यांना बाहेर काढले, पण त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.