विनयभंग प्रकरणी टेनिस प्रशिक्षकाला अटक; पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 15:58 IST2019-02-06T15:57:14+5:302019-02-06T15:58:42+5:30
कुलाबा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

विनयभंग प्रकरणी टेनिस प्रशिक्षकाला अटक; पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल
मुंबई - एका टेनिस प्रशिक्षकाला अल्पवयीन खेळाडूचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कुलाबा येथील मैदानावरच या प्रशिक्षकाला पोलिसांनीअटक केली असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलाबा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
कुलाबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 14 वर्षाखालील आंतर शालेय टेनीस स्पर्धा खेळत असून ती परराज्यातून आलेली आहे. रविवारी ती मैदानावरटेनिसची प्रॅक्टिस करत असताना प्रशिक्षक तिचा विनयभंग करत असल्याचे पाहून तिच्या आईला धक्काच बसला. 'प्रशिक्षक मुलीच्या अंगाला वाट्टेल त्या ठिकाणी आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करत होता. तसेच ती रडत असताना', ‘माझे ऐकलंस तर जिंकशील, नाहीतर तुला संघातून बाहेर काढेन’ अशी धमकी देखील तो देत होता असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. याबाबत या महिलेने प्रशिक्षकाला जाबही विचारला तेव्हा तो आपल्या अंगावर धावून आला असेही या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला मैदानातूनच अटक केली. आरोपीला न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.