शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

मोबाईलवरील स्टेटसवरुन येरवड्यात हाणामारी १० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 6:46 PM

‘चला रे यांची आज येथे विकेटच काढू’ असे म्हणून रमाशंकर याला पकडून हाता-बुक्क्यांनी मारहाण केली...

ठळक मुद्देहाणामारी करणारे एकाच गटातील असून त्यांच्यापैकी १० जणांना पोलिसांनी केली अटक

पुणे : मोबाईलवर सहा महिन्यांपूर्वी ठेवलेल्या स्टेटस व एकमेकांकडे पाहण्यावरुन तिघांवर कोयता व गजाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना येरवड्यातील आशापुरा स्टोअरसमोर मंगळवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास घडली़. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. हाणामारी करणारे हे सर्व एकाच गटातील असून त्यांच्यापैकी १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे़. या प्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़.या प्रकरणी रमाशंकर हिरालाल जैस्वाल (वय १८, रा. येरवडा) याने फिर्याद दिली आहे.  या प्रकरणी विजय रमेश राठोड (वय २४), रोहित राम कांबळे (वय १९), सागर संतोष माने (वय १९),अमित सुरेश गायकवाड (वय १९), गणेश शिवाजी पाटील (वय २४), साहिल संतोष सोनवणे (सर्व रा़ येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची  नावे आहेत. यापैकी  तिघे जण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, रमाशंकर हा त्याच्या मित्रासोबत रस्त्याच्याकडेला गप्पा मारत थांबला होता. यावेळी आरोपी तीन दुचाकीवरुन आरडा-ओरडा करत त्याठिकाणी आले आणि त्यांनी कोयते फिरवत दहशत निर्माण केली. यानंतर रमाशंकर व त्यांच्या मित्राला तुम्हाला माज आला आहे का? आम्हाला बघुन सुद्धा तुम्ही का थांबलात? आमची भीती वाटत नाही का? असे म्हणत त्यांच्या साथीदारांना ‘चला रे यांची आज येथे विकेटच काढू’ असे म्हणून रमाशंकर याला पकडून हाता-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर दोघांनी रमाशंकर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.त्याविरोधात विजय राठोड (वय २४, रा़ येरवडा) याने फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, ओमकार युवराज सोनवणे (वय २०), प्रज्वल बापु कदम (वय १९), आशिष अशोक परदेशी (वय २१), राजवीरसिंग रणजितसिंग सहोगा (वय १९, सर्व रा़ रामनगर, येरवडा) या चौघांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. राठोड याच्या फिर्यादीनुसार, हा प्रकार पांडु लमाणवस्ती येथे पहाटे सव्वादोन वाजता घडला़ विजय राठोड व त्यांचे मित्र घरासमोर उभे असताना मनोज जैस्वाल हा मोटारसायकलवरुन सारखा ये-जा करीत असल्याने त्याने व त्याच्या वहिनीने गल्लीत लहान मुले खेळत असतात़, गाडी हळू चालव, असे सांगितले होते़ त्याचा राग मनात धरुन त्याने साथीदारांसह हातात लोखंडी कोयता व गज घेऊन परिसरात दहशत पसरवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच राठोडचा मित्र रोहित कांबळे व सागर माने यांना शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस