शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

तलावात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; तरुणांचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 6:09 PM

Drowning Case : नागपूर येथून निसर्ग वाघ, कुणाल नेवारे, अभिनव जिचकार, प्रणय वासनिक, तन्मय कुंभारे व लक्ष्मीकांत बबडीलवार हे सकाळी ८ वाजताच्या सुमारास चार चाकी वाहनाने अंबाडा येथे पोहोचले.

ठळक मुद्देनिसर्ग प्रभाकर वाघ (१८) व कुणाल अशोक नेवारे (१८) दोघेही रा.रविनगर, नागपूर अशी मृत युवकांची नावे आहेत. 

नागपूर (रामटेक) : सहलीसाठी आलेल्या सहापैकी दोन मित्रांचा रामटेक येथील अंबाडा तलावात बुडून मृत्यू झाला. निसर्ग प्रभाकर वाघ (१८) व कुणाल अशोक नेवारे (१८) दोघेही रा.रविनगर, नागपूर अशी मृत युवकांची नावे आहेत. 

शासनाने अनलॉक केले आणि पर्यटक सैरभैर झाले. नागपुरातील सुखवस्तू कुटुंबातील सहा युवक मंगळवारी  रामटेकच्या अंबाडा तलाव परीसरात सहलीसाठी आले होते. पोहता येत नसतानाही तलावात आंघोळ करण्यासाठी उतरले. मौजमस्ती करता करता चार युवक तलावात बुडायला लागले. यात दोघांनी एकमेकाला वाचविले. पण दोघांना जलसमाधी मिळाली. 

नागपूर येथून निसर्ग वाघ, कुणाल नेवारे, अभिनव जिचकार, प्रणय वासनिक, तन्मय कुंभारे व लक्ष्मीकांत बबडीलवार हे सकाळी ८ वाजताच्या सुमारास चार चाकी वाहनाने अंबाडा येथे पोहोचले. सध्या मंदीर व तिर्थक्षेञ बंद आहे. येथे तपासणी नाक्यावर त्यांची गाडी थांबविण्यात आली. यानंतर या तरुणांनी गाडी बाजूला लावत पायीच अंबाडा तलाव गाठला. यातील चार युवक पोहण्यासाठी तलावात उतरले. येथे मौजमस्ती करता करता चौघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यापैकी अभिनव जिचकार याने प्रणय वासनिक याला बाहेर खिचून वाचविले. पण निसर्ग व कुणाल यांचा बुडून मृत्यू झाला. 

निसर्गचा मृतदेह स्थानिक मच्छीमारांनी बाहेर काढला. पण वृत लिहीत पर्यंत मात्र कुणालचा मृतदेह मिळाला नव्हता. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला यावेळी पाचारण करण्यात आले. पण त्यांनाही एक मृतदेह मिळाला नाही. त्यांचे प्रयत्न सुरु आहे. निसर्ग याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालय रवाना करण्यात आला. घटनेचा तपास तपास पीएसआय शिवाजी बोरकर,पोलीस शिपाई संतोष मारबते करीत आहेत.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेnagpurनागपूरPoliceपोलिसDeathमृत्यू