धक्कादायक! शिक्षकाने विद्यार्थीनीवर बलात्कार केला, २ वर्षे व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केले; पुढं जे घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 13:47 IST2025-01-26T13:41:47+5:302025-01-26T13:47:40+5:30
लखनौमध्ये एका शिक्षकाने नशीला पदार्थ देऊन विद्यार्थीनीवर अत्याचार केले. यानंतर व्हिडीओ केले. या व्हिडीओच्या आधारे तो दोन वर्षे विद्यार्थीला ब्लॅकमेल करत होता.

धक्कादायक! शिक्षकाने विद्यार्थीनीवर बलात्कार केला, २ वर्षे व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केले; पुढं जे घडलं...
उत्तर प्रदेश येथील लखनौ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनौमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थीनीला नशेचे पदार्थ देऊन लैंगिक अत्याचार केले. यानंतर व्हिडीओ केले. या व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करुन त्या शिक्षकाने विद्यार्थीनीवर पुढील दोन वर्षे बलात्कार करत राहिला. यानंतर त्याच्यावर दबाव आल्यानंतर त्याने विद्यार्थीनीसोबत लग्न केले. दोन वर्षानंतर दुसऱ्याच मुलीसोबत त्याने लग्न केल्याचे समोर आले.
मिळालेली माहिती अशी, ही घटना २०२३ च्या ऑक्टोंबर महिन्यातील आहे. त्यावेळी ती विद्यार्थीनी इंटरमिजिएटमध्ये शिकत होती. यावेळी भौतिकशास्त्राचे शिक्षक जितेंद्र कुमार शर्मा याने तिला फोन केला. तिला ड्रग्ज दिल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान शिक्षिकाने तिचे अनेक व्हिडिओही बनवल्याचा आरोप तिने केला आहे. नंतर, त्याने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबियांना या घटनेबद्दल माहिती दिली. कुटुंबीयांच्या दबावानंतर शिक्षकाने विद्यार्थीनीसोबत लग्न केले.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षकाचे आधीच एक लग्न झाले होते. ही माहिती तिला मिळाल्यानंतर पीडितेने चौकशी केली. यावेळी शिक्षकाने मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. यानंतर शिक्षकाची तक्रार पीडितेने पोलिसात केली.
पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे, या प्रकरणी शिक्षकाची चौकशी अजूनही सुरू आहे.
तेलंगणात पतीने केली पत्नीची हत्या
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातून एक भयानक हत्येची घटना समोर आली आहे. एका माजी सैनिकाने आपल्या ३५ वर्षीय पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे तलावात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, गेल्या शनिवारी (दि.१८) गुरु मूर्ती नावाच्या व्यक्तीने रचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मीरपेट पोलीस ठाण्यात आपली पत्नी वेंकट माधवी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी गुरु मूर्तीची चौकशी केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि अनेक धक्कादायक खुलासे केले.